साऊथच्या प्रसिद्ध कपल्समधील एक विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या मालदीवमध्ये हॉलीडेवर आहेत. गेल्या दिवशी शुक्रवारी दोघांना मुंबई एयरपोर्टवर स्पॉट केले गेले होते. माहितीनुसार दोघे एकत्र हॉलिडेसाठी रवाना झाला होते. आता पुष्पा अभिनेत्रीने विजयसोबत मालदीवमधून एक सुंदर फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे.
फ्लोरल मॅक्सी ड्रेस घातलेल्या रश्मिका मंदानाने आपला एक खूपच सुंदर फोटो इंस्टाग्राम स्टोरीमधून शेयर केला आहे. फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये ट्रॉपिकल व्यूसोबत मिरर सेल्फी क्लिक केला आहे. अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे कि, हाय लव. याशिवाय तिने व्हाईट कलरचा दिलवाला ईमोजी देखील शेयर केला आहे. सोशल मिडियावर चाहते रश्मिकाच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. जिथे काही लोक रश्मिकाच्या लुकचे कौतुक करत आहेत तर काही रश्मिका आणि विजयवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
गीता गोविंदा आणि डियर कॉमरेड सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाची केमेस्ट्री नेहमीच चर्चेमध्ये राहिले आहे. तथापि दोघे एकमेकांना फक्त चांगले मित्र असल्याचे सांगत होते. असो विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाला काल ७ ऑक्टोबरला मुंबई एयरपोर्टवर एकत्र पाहिले गेले होते.
कपलने या दरम्यान चाहत्यांना आणि कॅमेरामसला जबरदस्त पोज दिल्या. तथापि दोघे वेगवेगळ्या कारमध्ये आले होते. पण दोघांची मंजिल एकच होती. माहितीनुसार रश्मिका आणि विजय मालदीवमध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. तर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने कधीच डेटिंगच्या बातम्यांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
रश्मिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट गुडबॉय रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ती अमिताभ बच्चन आणि नीना गुप्तासोबत दिसत आहे. याशिवाय तिच्याजवळ अल्लू अर्जुनसोबत पुष्पा २ आणि थलपति विजयसोबत वरिसु देखिला आहे.
विजय देवरकोंडा डायरेक्टर पुरी जगन्नाथच्या लायगर चित्रपटामध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये अनन्या पांडेदेखील मुख्य भूमिकेमध्ये होती. या चित्रपटाला दर्शकांनी काहीच पसंती दिली नाही. विजय आणि अनन्या शिवाय चित्रपटामध्ये राम्या कृष्णन देखील मुख्य भूमिकेमध्ये होती. माईक टायसनने देखील विजयच्या चित्रपटामध्ये कॅमियो केला होता. लवकरच विजय पुरीसोबत जन गण मन चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.