आलिया-रणबीरनंतर आता रश्मिकादेखील अडकणार विवाहबंधनामध्ये, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार लग्न…?

By Viraltm Team

Published on:

सध्या प्रसिद्ध तेलगु अभिनेता विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या पुष्पा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. अशामध्ये आता तिच्या लग्नाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागल्या आहेत.

या वर्षाच्या अखेरीस सुपरस्टार विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबतच्या लग्न करू शकतात अशी देखील माहिती समोर आली आहे. विजय आणि रश्मिकाचे चाहते सोशल मिडियावर याबद्दल जोरदार चर्चा करत आहेत. तरी अजूनपर्यंत दोन्ही कलाकारांनी आपल्या लग्नाबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

रश्मिका आणि विजय गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड चित्रपटामध्ये एकत्र काम करताना पाहायला मिळाले होते. चित्रपटामधील दोघांची केमेस्ट्री दर्शकांना खूपच आवडली होती. तेव्हापासून दोघांच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या.

नुकतेच अभिनेता विजय देवरकोंडाने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. विजयचा लायगर चित्रपट नुकतेच रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये विजयसोबत अनन्या पांडेदेखील मुख्य भूमिकेमध्ये होती. तर रश्मिका मंदान्नाचा विकास बहल दिग्दर्शित गुडबाय चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तर रश्मिका अल्लू अर्जुनसोबत पुष्पा चित्रपटामध्ये देखील दिसली होती आणि पुष्पा २ चित्रपटासाठी देखील ती लवकरच आपली शुटींग सुरु करणार आहे.

Leave a Comment