साऊथ सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या बॉलीवूड डेब्यूमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. ती गुडबाय चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. अशामध्ये ती आता आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. यादरम्यान रश्मिका मंदानाने आपल्या जुन्या दिवसांना आठवत एक किस्सा आठवत एक किस्सा शेयर केला, जेव्हा तिला डियर कॉमरेड चित्रपटामध्ये विजय देवरकोंडासोबत एक बोल्ड सीन दिल्यामुळे खूपच ट्रोल केले गेले होते. अभिनेत्रीने सांगितले कि त्या दिवसांमध्ये ती रात्रभर रडत बसायची.
२०१९ मध्ये डियर कॉमरेड हा साऊथ चित्रपट रिलीज झाला होता, ज्याचे दिग्दर्शन भरत कम्मा यांनी केले होते. या चित्रपटामध्ये रश्मिकासोबत विजय देवरकोंडा देखील दिसला होता आणि चित्रपटामध्ये दोघांचा एक इंटेंस किसिंग सीन होता जो खूपच चर्चेमध्ये राहिला होता. या सीनला पाहिल्यानंतर चाहत्यांनी रश्मिकाला चांगलेच धारेवर धरले होते. रश्मिका मंदानाने आपल्या लेटेस्ट मुलाखतीमध्ये सांगितले कि कसे त्या एका सीनमुले तिला सतत ट्रोलिंग आणि ऑनलाइन द्वेषाला बळी पडावे लागले होते.
रश्मिका मंदाना पुढे म्हणाली कि तो तिच्या करियरचा सर्वात वेदनादायक आणि सर्वात वाईट काळ होता. तिला या काळामधून जाताना खूपच कठीण गेले होते. त्या दिवसामधील आसपासच्या नकारात्मकतेचा तीचाय्व्र खूप परिणाम झाला होता. या कारणामुळे ती नेहमी आपल्या बेडवर उशीमध्ये डोके खुपसून रडत राहायची. अभिनेत्री म्हणाली कि अनेक वेदनादायक क्षण आले, मी अनेक गोष्टी वाचत होये आणि मला तसले वाईट स्वप्ने पडत होती. यादरम्यान मला फक्त हेच वाटले कि सर्वांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली कि त्या दिवसांमध्ये एक स्वप्नाने मला खूपच त्रास दिला होता. मला माहित नव्हते कि ते काय होते आणि कसे होते. मी अशा स्वप्नांमुळे जागी व्हायचे आणि स्वतःला बेडवर रडताना बघायचे. रश्मिका मंदानाचा गुड बाय चित्रपट ७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केले आहे.