एक्स्प्रेशन्स क्वीन आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. कारण तिचे नावच पुरेस आहे तिची ओळख सांगण्यासाठी. साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील आपल्या फिल्मी करियरची सुरुवात करणारी रश्मिका आपल्या प्रसिद्धीमध्ये आणखीनच भर टाकताना दिसत आहे.
अख्या भारतामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणारी रश्मिकानं खूपच कमी वयामध्ये मोठे यश मिळवले आहे. पुष्पा चित्रपटामधून अभिनेत्री रश्मिका घराघरामध्ये ओळखली जाते. इतकेच नाही तर परदेशांमध्ये देखील तिने आपली लोकप्रियता मिळवली आहे.
सध्या अभिनेत्री रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होता आहे. एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून देखील रश्मिका खूप ओळखली जाते. व्हायरल भैयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे.
रश्मिका एका ठिकाणाहून बाहेर येतानाचा हा व्हिडीओ आहे. रश्मिका ज्यावेळी तेथून बाहेर येते तेव्हा तेथील फोटोग्राफर तिचे फोटो घेण्यासाठी पुढे येतात त्यावेळी रश्मिका त्यांच्याकडे कुतुहलाने पाहून विचारते कि या फोटोंच तुम्ही काय करणार आहात.
View this post on Instagram
तेवढ्यात रश्मिकाचे चाहते देखील फोटो काढायला सुरुवात करतात. विशेष म्हणजे रश्मिकादेखील त्याच्यासोबत पोज देऊ लागते. चाहत्यांची फोटो काढण्यासाठी वाढणारी गर्दी पाहून रश्मिकाचे बॉडीगार्ड गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुढे येतात. यादरम्यान रश्मिका तिच्या बॉडीगार्डला लगेच थांबवते आणि आपल्या चाहत्यांना फोटो काढण्यासाठी पुढे येते. रश्मिका एक उत्कृष्ठ अभिनेत्री तर आहेच पण तिचे मन किती मोठे आहे हे या कृतीमधून स्पष्ट दिसत आहे.