रणवीर सिंहने ‘न्यू ड’ फोटोशूटबद्दल दिले स्पष्टीकरण, म्हणाला; ‘प्रा’य व्हे’ट पार्ट्स’ दाखवणारा…

By Viraltm Team

Published on:

गेल्या महिन्यामध्ये न्यू ड फोटोशूट प्रकरणामध्ये पोलिसांना दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये रणवीर सिंहने एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला कि फोटोंसोबत छेडछाड करण्यात आली आहे. रणवीरने म्हंटले कि ज्या फोटोंच्या आधारावर त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे ते फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. अभिनेत्याने म्हंटले आहे कि प्रा’य व्हे’ट पार्ट्स दाखवणारा फोटो पेपर मॅगजीनच्या फोटोशूटचा भाग नव्हता.

मुंबईमध्ये २९ ऑगस्ट रोजी न्यूड फोटोशूट प्रकरणामध्ये अभिनेता रणवीर सिंहने आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंहने असा दावा केला आहे कि कोणीतरी त्याच्या फोटोंसोबत छेडछाड करून ते बदलले आहेत.

अभिनेत्याच्या विरुद्ध जुलै महिन्यामध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला नोटीस जारी करून त्याला तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगण्यात आले होते. अभिनेत्याने २९ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता अधिकाऱ्यांसमोर हजर राहून आपली प्रतिक्रिया नोंदवली होती.

रणवीर सिंहवर आरोप लावत अशी तक्रार दाखल करण्यात आली होती कि त्याने महिलांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. या तक्रारीच्या आधारावर रणवीर सिंहवर तक्रार दाखल करण्यात आली होती. रणवीर सिंहने पेपर मॅगझिनच्या कव्हर स्टोरीसाठी एक न्यू ड फोटोशूट केले होते. हे फोटोशूट २१ जुलै रोजी सोशल मिडियावर शेयर केले होते. फोटोशूटमध्ये रणवीर पूर्णपणे न्यू ड दिसला होता. यानंतर हा वाद सुरु झाला होता. सोशल मिडियावर या फोटोवरून रणवीर सिंहला खूप ट्रोल करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंहच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो जयेशभाई जोरदार चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. पण रणवीरच्या या चित्रपटाला काही खास प्रतिसाद मिळाला नाही. रणवीर आता लवकरच रोहित शेट्टीच्या सर्कस आणि करण जौहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये दिसणार आहे. रणवीर दोन्ही चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहेत.

Leave a Comment