रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलीवूड जगतामधील प्रसिद्ध जोडी आहे. या दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांना खूपच पसंद आहे. तसे तर कॅमेऱ्यासमोर हि जोडी खूपच रोमँटिक अंदाजामध्ये दिसत असते पण रणबीर आणि आलिया रियल लाईफमध्ये कशी राहते चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते.

यामुळे त्यांनी नुकतेच आपले बेडरूम सिक्रेट मुलाखतीदरम्यान उघड केले आहे. त्यांनी सांगितले कि आलिया प्रेग्नंट झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे त्याला बेडच्या एका कोपऱ्यामध्ये झोपावे लागते.

रणबीर कपूरने एका मुलाखतीमध्ये त्याची पत्नी आलिया भट्टच्या झोपण्याच्या स्टाईलचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले कि आलिया इतक्या मोठ्या बेडवर गोल गोल फिरत राहते ज्यामुळे त्याला बेडच्या एका कोपऱ्यामध्ये झोपावे लागते. त्याने हे देखील सांगितले कि आलियाच्या या सवयीमुळे त्याची झोप देखील उडते.

आलियाला रणबीरच्या वाईट सवयीबद्दल विचारले गेले तेव्हा आलिया म्हंटले कि मला रणबीरने शांत राहणे पसंद आहे पण कधी कधी मला रणबीरचे शांत राहणे देखील त्रासदायक ठरते. आलियाने सांगितले कि रणबीर कपूर तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि हि गोष्ट चांगली वाटते.

कधी कधी ती एक्सपेक्ट करते कि रणबीर कपूरने काही गोष्टींबद्दल बोलायचे जिथे बोलावे लागते, पण ज्याप्रकारे तो शांत राहतो हि सवय चांगली वाटत नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघे नुकतेच रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपटामध्ये दोघांच्या कामाचे कौतुक केले गेले. बॉयकॉट ट्रेंड असूनही या चित्रपटाच्या यशाने बॉलिवूडमध्ये आशा निर्माण केली आहे. हा चित्रपट ३ भागात बनवण्यात आला आहे. ब्रह्मास्त्र भाग १: शिवाच्या यशानंतर आता चाहते भाग २ आणि ३ ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.