आलिया आणि रणबीरची लव स्टोरी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती आणि दोघांनी १४ एप्रिल रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नामध्ये फक्त ५० जवळचे नातेवाईक सामील झाले होते. लग्नाच्या अगोदर रणबीर आणि आलिया एकमेकांना ५ वर्षा पासून डेट करत होते. लग्नानंतर रणबीरने सांगितले कि लग्नानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच बदल पाहायला मिळालेला नाही.
आपल्या लग्नाविषयी गंभीर होत रणबीरने सांगितले कि, आम्हाला कोणताही मोठा बदल जाणवलेला नाही. आम्ही दोघे ५ वर्षापासून एकत्र आहोत आम्ही विचार केला कि जर आम्ही लग्न केले तर आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल जाणवेल. पण तसे झाले नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कामावर परतलो. आलिया तिच्या शूटसाठी निघून गेली होती आणि मला देखील शुटींगसाठी मनालीला जावे लागले.
जेव्हा आलिया लंडनहून परत येईल आणि माझा शमशेरा चित्रपट प्रदर्शित झालेला असेल तेव्हा आम्ही दोघे एक आठवड्याची सुट्टी घेण्याच्या विचार करत आहोत. अजूनपर्यंत आम्हाला हेच जाणवलेले नाही कि आम्ही लग्न केलेले आहे.
आपल्या लग्नाच्या काहीच दिवसांमध्ये रणबीर आणि आलिया आपल्या कामावर लोकांना दिलेल्या प्रोफेशनल कमिटमेंट्स परतले होते. जिथे एकीकडे आलिया आपल्या हॉलीवुड डेब्यूसाठी रवाना झाली तर रणबीर आणि संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपट एनिमलच्या शुटींगसाठी मनालीला रवाना झाला होता.
जेव्हा रणबीरला त्याच्या करियरसंबंधी एंबीशंसबद्दल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले कि मी हॉलीवूडबद्दल विचार करत नाही. मला फक्त ब्रह्मास्त्रबद्दलच स्वप्ने येतात. मी फक्त ओरिजिनल कंटेंट विषयी विचार करतो, जो आपल्या दर्शकांना आवडेल.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.