रणबीर कपूरच्या फोनच्या वॉलपेपरवर पत्नी आणि मुलीचा नाही, तर या खास व्यक्तीचा आहे फोटो, पाहून चाहते झाले थक्क…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या पॅरेंटहुड इंजॉय करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहाचा जन्म ठीक २ महिन्यापूर्वी ६ नोव्हेंबरला झाला होता. अशामध्ये तुम्ही विचार करत असाल कि रणबीरच्या फोनच्या वॉलपेपरवर राहाचा फोटो असेल. पण असे नाही, रणबीरच्या फोनच्या वॉलपेपरवर त्याची मुलगी राहाचा फोटो नाही किंवा त्याची पत्नी आलियाचा फोटो नाही.

वास्तविक रणबीरचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याच्या फोनवरील वॉलपेपर पाहायला मिळत आहे. चाहते तर रणबीरच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवतात. अशामध्ये लोकानी पाहिले कि त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर कोणाचा फोटो आहे. रणबीर आणि आलिया भट्ट आपल्या मुलीसोबत घराच्या बाहेर स्पॉट झाले होते. रणबीर त्याची मुलगी राहाला खूपच प्रेमाने फिरवत होता.

रणबीरच्या फोनमध्ये दुसऱ्या कोणाचा नाही तर दिवंगत अभिनेता ऋषी कपूरचा फोटो आहे. व्हिडीओमध्ये रणबीरच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर तो लांब दाढी व्हाईट टीशर्ट आणि ब्लू डेनिम स्मार्ट लुकमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्याने देखील पाहिला आहे तो रणबीरचे कौतुक करत आहे. रणबीर त्याचे वडील ऋषी कपूरच्या खूपच जवळ होता. ऋषी कपूरच्या निधनानंतर रणबीर कपूर खूपच खचला होता.

ऋषी कपूर यांना रणबीर कपूर आणि आलियाचे लग्न समोर पाहायला होते पण कदाचित त्यांच्या नशिबाला हे मंजूर नव्हते. ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी ३० एप्रिल २०२० रोजी निधन झाले होते. कोरोना दरम्यान त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये जास्त लोक सामील झाले नव्हते. ऋषी कपूरला ल्यूकेमिया कँसर झाला होता ज्याचा इलाज त्यांनी विदेशामध्ये केला होता.

रणबीर कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो येणाऱ्या काळामध्ये एनिमल चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. याशिवाय रणबीर तू झूठी मैं मक्कारमध्ये श्रद्धा कपूर सोबत स्क्रीन शेयर करणार आहे. या चित्रपटाचे देखील पोस्टर रिलीज झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

Leave a Comment