राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत केले लग्न, फोटो सोशल मिडियावर झाले तुफान व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

फिल्म इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानीच्या कोर्ट मॅरेजचे फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. व्हायरल फोटोमध्ये राखी सावंत कोर्ट मॅरेजच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी तिच्या बाजूला उभा आहे.

राखी सावंत आणि आदिल दुर्रानीच्या कोर्ट मॅरेजचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राखी सावंत व्हाइट आणि पिंक कलरचा शरारा घातलेली दिसत आहे. राखीने डोक्यावर चुनरी घेतली आहे. तर आदिल सिंपल लुक ब्लॅक शर्ट आणि डेनिम्स मध्ये पाहायला मिळत आहे.

राखी सावंतच्या लग्नाचे तीन फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये ती आणि आदिल एकमेकांना हार घातलेले आणि हातामध्ये लग्नाचे सर्टिफिकेट पकडून उभे आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये लग्नाच्या कागदपत्रांवर राखी सही करत आहे आणि आदिल तिच्या तिच्यासोबत बसला आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये राखी सावंत आणि आदिल दुर्रानीच्या लग्नाचे सर्टिफिकेट आहे.

राखी सांवतने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. राखी सावंतने याआधी रितेश नावाच्या एका व्यक्तीसोबत लग्न केले होते. अनेक दिवस राखी रितेशच्या नावाचे कुंकू लावून फिरत होती नंतर ड्रामा क्वीनने बिग बॉस १५ मध्ये रितेशचा चेहरा दाखवला होता. राखी सावंतने शोमधून बाहेर पडल्यानंतर खुलासा करत म्हंटले होते कि तिचा पती आधीपासूनच विवाहित आहे यामुळे त्यांचे लग्न मान्य नाही आणि नंतर राखीने रितेशसोबतची सर्व नाती तोडली होती. रितेशनंतर राखीने आदिलला डेट करायला सुरुवात केली आणि आता व्हायरल फोटो पाहून हे स्पष्ट होत आहे कि दोघांनी लग्न देखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FILMYWAVE (@filmywave)

Leave a Comment