कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव आता आपल्यामध्ये नाहीत. कॉमेडियनने बुधवारी सकाळी दिल्लीच्या एम्समध्ये अंतिम श्वास घेतला. राजू गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळ हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. देशभरामध्ये त्याचा प्रत्येक चाहता त्यांच्या ठीक होण्याची कामना करत होता.

पण सर्व अपेक्षा मोडून राजू श्रीवास्तव यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याच्या बातमीने प्रत्येकजण दुखी आणि स्तब्ध झाला आहे. त्यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. यादरम्यान आता राजूच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांची मुलगी अंतराची प्रतिक्रिया समोर आली आहे.
गुरुवारी कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव पंचतत्वामध्ये विलीन झाले. दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. यादरम्यान राजूची मुलगी अंतराने सोशल मिडियावर वडिलांच्या निधनावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेयर करत सर्वांना धन्यवाद म्हंटले ज्यांनी राजूच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अंतराने बुधवारी रात्री इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो स्टोरीमध्ये शेयर केले. स्टोरीमध्ये तिने त्या सर्व लोकांचे फोटो शेयर केले ज्यांनी राजू श्रीवास्तवच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजलि दिली. लोकांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल लोकांचे आभार व्यक्त करत अंतराने हि पोस्ट शेयर केली आहे. अंतरा वडिल हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांच्याबद्दल अपडेट देत होती.
१० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना अचानक बेशुद्ध होऊन ते खाली पडले होते. यानंतर त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. त्यानंतर ४१ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते मात्र बुधवारी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. राजू यांच्या निधनावर अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे यामध्ये पीएम मोदी ते अक्षय कुमार, अजय देवगण आणि आमिर खान यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.