जाणून घ्या किती करोडच्या संपत्तीचे मालक आहेत सुपरस्टार रजनीकांत, एका चित्रपटासाठी घेतात तब्बल इतकी मोठी रक्कम…

By Viraltm Team

Published on:

फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी रजनीकांत एक मानले जातात. साउथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूडपर्यंत त्यांचे असंख्य चाहते आहेत. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारे रजनीकांत यांनी रोबोट, लिंगा, शिवाजी द बॉस आणि २.० सारखे धमाकेदार ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

साउथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार रजनीकांतने आज जे स्थान मिळवले आहे त्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली आहे. रजनीकांतने आपल्या कौशल्याच्या बळावर हे स्थान मिळवले आहे. एके काळी हा विचार करणे देखील त्यांच्यासाठी एक स्वप्न होते. रजनीकांतचे चित्रपटामध्ये असणे म्हणजे चित्रपट सुपरहिट असल्याची हमी मानली जाते.

१२ डिसेंबर १९५० रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये जन्मलेले रजनीकांत ७१ वर्षाचे झाले आहेत. साउथ फिल्म इंडस्ट्रीसोबत रजनीकांत यांनी हिंदी चित्रपटांमध्ये नाव कमवले. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड़ आहे. अभिनेत्याचे चाहते जगभरामध्ये पसरले आहेत. रजनीकांतने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्याला त्याचे चाहते थलाइवा म्हणून देखील ओळखतात.

कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल कि फिल्मी जगतामध्ये आपले करियर बनवणारे रजनीकांत कधी काळी बस कंडक्टर म्हणून काम करत होत. त्यांनी आपल्या मेहनत आणि कौशल्याच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली. सध्याच्या काळामध्ये ते सफल आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. इतकेच नाही तर रजनीकांत यांचे नाव श्रीमंत अभिनेत्यांमध्ये देखील घेतले जाते.

सुपरस्टार रजनीकांत यांची गणना सर्वाधिक फीस घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. माहितीनुसार रजनीकांत आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ५० करोड रुपये इतकी घसघशीत फीस घेतात. याशिवाय रजनीकांत यांचे नेट वर्थ ३६५ करोड इतके आहे. इतकेच नाहीतर हे देखील सांगितले जाते कि रजनीकांतने १०० ते १२० करोड रुपयांची गुंतवणूक देखील केली आहे. रजनीकांत यांच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत चित्रपट आहे. ते ४ दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत.

रजनीकांत आपल्या कुटुंबासोबत चेन्नईमधील आपल्या आलिशान घरामध्ये राहतात. त्यांच्या आलिशान घराची किंमत करोडो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या घराचे सौंदर्य आणि भव्यता पाहताच बनते. रजनीकांतच्या या घरामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

रजनीकांत यांच्या कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याजवळ इतर कलाकारांप्रमाणे खूप मोठे कलेक्शन नाही. रजनीकांत यांच्याजवळ तीन कार आहेत, ज्यामध्ये रेंज रोवर, बेंटले सोबत टोयोटा इनोवा सामील आहेत. या कार्समध्ये रजनीकांत प्रवास करणे पसंद करतात. रजनीकांत यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच त्यांच्या जेलर या आगामी चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज झाले आहेत. पोस्टर खूपच दमदार आहे आणि चाहत्यांद्वारे खूपच पसंद केले जात आहे. चाहत्यांना त्यांच्या या चित्रपटाची खूप आतुरता लागून राहिली आहे.

Leave a Comment