साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सुपरस्टार रजनीकांत यांनी अमाप प्रसिद्धी मिळवली. नुकतेच रजनीकांत यांनी आपला वाढदिवस साजरा केला. रजनीकांत यांचे फक्त देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये चाहेत आहेत.
त्यांच्या अभिनय, स्टाईल, बोलण्याची शैली यासाठी लाखो चाहते वेडे आहेत. रजनीकांत देखील आपल्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतात. रजनीकांत यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. यादरम्यान त्यांनी अनेकजणांचे आभार मानले.
रजनीकांत यांनी १९७५ मध्ये रिलीज झालेल्या अबूर्वा रांगणगल चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. तर अंधा कानून हा त्यांच्या बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी बेंगळूरु मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन मध्ये कंडक्टर म्हणून काम केले होते.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंतच्या अभिनय करियरमध्ये त्यांनी हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम, बंगाली अशा विविध भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले.
रजनीकांत यांना गेल्या वर्षी चित्रपट क्षेत्रामधील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करणायत आले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रजनीकांत यांनी अनेकजणांचे आभार मानले. त्यांनी हा पुरस्कार त्यांचे गुरु के बालाचंद्र यांना अर्पण केला होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले होते.
ते पुढे म्हणाले होते कि मला काही लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला साथ दिली. माझे भाऊ सत्यनारायण गायकवाड हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले, मला अध्यात्मची शिकवण दिली.
त्याचबरोबर कर्नाटक मधील माझे मित्रे आणि सहकारी राजबहादूर जे बस ड्राईव्हर आहेत त्यांचे देखील आभार मानतो. कारण मी जेव्हा बसमध्ये कंडक्टर होतो तेव्हा त्यांनी माझ्यातील अभिनय कौशल्य ओळखून मला चित्रपटामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर सर्व निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्नीशियन्स, मिडिया आणि माझे चाहते यांचे देखील आभार मानतो. त्यांच्याशिवाय हे काहीच शक्य नव्हते. असे देखील ते यावेळी म्हणाले.