बॉलीवुड अभिनेत्री राधिका आपटेचे काही लेटेस्ट फोटोज सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. वास्तविक राधिका आपटे रात्री उशिरा मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. अभिनेत्रीने यादरम्यानचे काही फोटो आणि लुक सोशल मिडिया सध्या खूपच चर्चेचा विषय बनले आहेत.

राधिका आपटे हिंदी चित्रपटामध्ये आपल्या शानदार अभिनयामुळे ओळखली जाते. राधिकाने बॉलीवूडमध्ये अनेक हटके चित्रपट केले आहेत. राधिका फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मची देखील क्वीन आहे. नुकतेच अभिनेत्रीला मुंबईमध्ये स्पॉट केले गेले.

राधिका आपटे यादरम्यान कॅज्युअल लूकमध्ये खुच सुंदर अंदाजामध्ये दिसत होती. यासोबत अभिनेत्री यादरम्यान कॅमेरावाल्यांपासून वाचताना दिसत होती. राधिका आपटेचे यादरम्यानचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. राधिका आपटेने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये आपल्या अभिनयाचे शानदार प्रदर्शन केले आहे. लस्ट स्टोरीज, घोल, पार्च्ड, अंधाधुन, सेक्रेड गेम्स सारख्या चित्रपटांमध्ये ती पाहायला मिळाली होती.

या सर्व चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये राधिकाने आपले टॅलेंट दाखवले आहे आणि स्क्रिप्टच्या डिमांडनुसार बोल्ड अंदाज देखील दाखवला आहे. बहुतेक लोकांना हे माहित नाही कि राधिका विवाहित आहे. तिने बेनेडिक्ट टेलर सोबत लग्न केले होते जो लंडनमध्ये एक फेसम म्यूजिशियन आहे.

राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा फॉरेंसिक चित्रपट २४ जून रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत विक्रांत मेसी आणि प्राची देसाई देखील मुख्य भुमिकेमध्ये दिसले होते. याशिवाय ती ऋतिक रोषण रोशनसोबत विक्रम वेधा चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.