चित्रपटामध्ये काम करायचे असेल तर सर्वात पहिला सुंदर दिसणे खूप महत्वाचे आणि तेव्हढेच नाही तर आपले शरीर देखील व्यवस्थित असायला हवे हे कोणाच्याना कोणाच्या तोंडामधून तुम्ही कधीना कधी ऐकलेच असेल. अशामध्ये राधिका आपटेने तिच्यासोबत घडलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान राधिका आपटेने निर्मात्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रपट करत असताना राधिकाने आलेल्या वाईट अनुभवाबद्दल अगदी उघडपणे सांगितले. अभिनेत्री राधिका आपटेला नुकतेच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

राधिका पुढे म्हणाली कि करियरच्या सुरुवातीमध्ये अगदी विचित्र कारणे देवून चित्रपटांमधील भूमिका नाकारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देखील तोच प्रकार घडला. विचित्र कारण देऊन मला चित्रपटासाठी नाकारण्यात आले. याचे कारण तर खूपच विचित्र होते.

निर्माता म्हणाला माझ्या तुलनेमध्ये दुसऱ्या अभिनेत्रीचे ओठ आणि तिची फिगर खूप चांगली आहे. दुसरी अभिनेत्री तुझ्यापेक्षा खूपच आकर्षक दिसते आणि तिच्यामुळे चित्रपट खूप चालेल. राधिका पुढे म्हणाली कि करियरच्या सुरुवातीला तर मला खूप वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले होते.

जेव्हा मी या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काम करू लागले होते तेव्हा माझ्या शरीरावर काम करणे गरजेचे आहे असा देखील मला सल्ला देण्यात आला होता. सुरुवातीला माझ्यावर खूपच दबाव होता. अगदी पहिल्याच भेटीमध्ये मला नाकाची सर्जरी करून घे असे सांगण्यात आले.

राधिका पुढे म्हणाली कि हे सत्र कित्तेक दिवस असेच सुरु होते. केसांना कलर करण्यासाठीच मला जवळ जवळ तीस वर्षे लागली. पण मी कधीच साधे इंजेक्शन देखील घेतले नाही आणि घेणार देखील नाही. या गोष्टीची मला नेहमी चीड यायची कारण मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करत होते.