बॉलीवूड आणि ग्लॅमरचे जग बाहेरून जितके चांगले वाटते तितकेच ते आतमधून खूपच भयावह आहे. खासकरून त्या मुलींसाठी ज्या आपले घर सोडून अभिनय क्षेत्रामध्ये आपले करियर करण्यासाठी मुंबईला येतात. अभिनेत्री बनण्यासाठी अशा मुलींना कास्टिं’ग का’उचचा सामना देखील करावा लागतो.

बॉलीवूडच्या अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांनी भलेहि आज बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक काळ असा होता जेव्हा त्यांना यातून देखील जावे लागले. त्यामधीलच एक अभिनेत्री आहे राधिका आपटे.

पॅडमॅन आणि अंधाधुंध सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली राधिका आपटे आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. अशामध्ये आज आपण राधिकाच्या अशा काळाबद्दल जाणून घेणार आहोत, जेव्हा तिला देखील का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला होता. राधिकाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान याची माहिती दिली होती. तिने मुलाखतीदरम्यान सांगितले कि मुंबईमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये कधी-कधी लोक तिला रात्री भेटायला बोलावत असत, पण ती स्पष्ट मना करत होती.

राधिका पुढे म्हणाली कि ते लोक तुम्हाला चित्रपटामध्ये काम देण्याचे आश्वासन देतात आणि नंतर ऑडि’शनच्या निमित्त नको ते करतात. पण मी यांना कधीच भेटले नाही. पुढे राधिका म्हणाली कि एकदा तिच्याजवळ एक फोन आला होता आणि त्याने म्हंटले कि जर तुला प्रोड्यू’सरला भेटायचे असेल तर त्याच्यासोबत झो’पावे लागेल.

राधिका मुलाखतीमध्ये म्हणाली कि, मला त्या व्यक्तीच्या बोलण्यावर खूप हसू आले आणि मी त्याला स्पष्ट सांगितले कि मला प्रोड्यू’सरला भेटायचे नाही. तिने सांगितले कि साउथमध्ये स्पष्टचा सांगतात कि त्यांना तुमच्यासोबत से’क्स करायचा आहे.

ती पुढे म्हणाली कि, मी यावर जास्त काही लक्ष देत नाही आणि मला तर वाटत नाही कि मला यामुळे माझे काम गमवावे लागले आहे. कारण माझ्यापर्यंत त्यांना मी पोहोचू दिले नाही. राधिका म्हणाली कि, मी अनेक लोकांसोबत काम केले आहे, पण कधी तिला अशा गोष्टीचा सामना करावा लागला नाही.

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या वाह, लाइफ हो तो ऐसी चित्रपटामधून राधिकाने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. यानंतर राधिकाने बॉलीवूडच्या अनेक मोठ-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, मल्याळम, तेलगु आणि इंग्लिश चित्रपटांमध्ये देखील राधिकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.