आपल्याच सुंदर विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला होता ‘हा’ अभिनेता, पहा अशी सुरु झाली होती लव्ह स्टोरी…

By Viraltm Team

Published on:

हिंदी आणि साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता आर माधवन आपल्या उत्कृष्ट अदाकारीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर त्याने आपल्या शांत स्वभावाने आपल्या चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आर माधवनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे.

अभिनेता आर माधवन विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे. आर माधवनने सरिता बिरजेसोबत लग्न केले होते. दोघे १९९९ मध्ये विवाह बंधनामध्ये अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला २३ वर्षे लोटली आहेत.

लग्नानंतर आर माधवन आणि सरिता एका मुलाचे आईवडील बनले होते. त्यांच्या मुलाचे नाव वेदांत माधवन आहे. असो आज आपण आर माधवनची पत्नी सरिता बिरजेबद्दल जाणून घेणार आहोत. आर माधवनची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत दिग्गज अभिनेत्रींना देखील टक्कर देते.

आर माधवन आपल्या विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला होता. त्याने स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. कोल्हापूरमध्ये आर माधवनकडून सरिता डेवलेपमेंटचे क्लालेस घेत होती. दोघांची भेट याच कारणामुळे झाली होती. असे म्हंटले जाते कि आर माधवनला सरिता पहिल्याच भेटीमध्ये आवडली होती.

दुसरीकडे आर माधवन कडून क्लास घेतल्यामुळे सरिता खूपच खुश होती आणि ती अभिनेत्याला धन्यवाद देऊ इच्छित होती. तिने एका वेगळ्या पद्धतीने आर माधवनला धन्यवाद दिले आणि तिने एका डिनरचे आयोजन केले आणि त्याला आमंत्रित केले. डिनर डेट नंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि नंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले.

काळानुसार माधवन आणि सरिताचे नाते अधिकच मजबूत होत गेले. दोघांनी एकमेकांना एक दोन वर्षे नाही तर तब्बल आठ वर्षे डेट केले होते. लग्नाच्या अगोदर दोघांमध्ये आठ वर्षे रिलेशन राहिले होते. यानंतर दोघांनी १९९९ मध्ये आपल्या प्रेमाला लग्नाचे नाव देण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर माधवनने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून केली होती. त्याने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या अलैपायुथे चित्रपटामध्ये काम केले होते. यानंतर त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये त्याने २००१ आलेल्या रहना है तेरे दिल में चित्रपटामधून एंट्री केली होती. नुकतेच आर माधवन रॉकेट्री: द नांबी इफेक्ट मध्ये देखील दिसला होता.

Leave a Comment