अमाप संपत्तीचा मालक आहे आर माधवन, कुटुंबासोबत या आलिशान घरामध्ये जगतो लक्झरी लाईफ…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आर माधवन अशा काही कलाकारांपैकी एक आहे जो आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबत ओळखला जातो. आर माधवनने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याच्या प्रत्येक भूमिकेचे खूपच कौतुक झाले. १ जून १९७० रोजी झारखंड जमशेदपुर येथे जन्मलेल्या आर माधवनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर अमाप लोकप्रियता मिळाली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्या आयुष्यासंबंधी काही न ऐकलेल्या गोष्टी आणि त्याच्या संपत्तीबद्दल.

आर माधवनचे पूर्ण नाव रंगनाथन माधवन आहे. त्याने मुंबईच्या केसी कॉलेजमधून आपले पोस्ट ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर त्यांनी अभिनेता बनण्याची इच्छा व्यक्त केली. अशामध्ये त्याने बनेगी अपनी बात या टीव्ही सिरीयलमधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली आणि नंतर त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. आर माधवनने इस रात की सुबह नहीं चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. पण त्याला २००१ मध्ये रिलीज झालेल्या रहना है तेरे दिल में चित्रपटामधून लोकप्रियता मिळाली.

या चित्रपटामध्ये तो प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्जासोबत दिसला होता. चित्रपटामधील जोडी दर्शकांना खूपच आवडली होती. आज देखील या चित्रपटाची क्रेज अजून काही कमी झालेली नाही. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी माधवनला स्क्रीन अवॉर्डने देखील सन्मानित केले गेले होते. यानंतर त्याने रंग दे बसंती, ३ इडियट्स, तनु वेड्स मनु सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

आर माधवन माधवन आज करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. एका माहितीनुसार तो सध्या १०३ करोड रुपयांचा मालक आहे. मुंबईमध्ये त्याचे आलिशान घर आहे ज्याची किंमत करोडो रुपयांमध्ये सांगितली जाते. आर माधवन नेहमी आपल्या घराचे सुंदर फोटो शेयर करत असतो. ज्याचे मॉडर्न फर्निचर आणि फॅन्सी लाइट्स पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की तो खूप लक्झरी जीवन जगणे पसंद करतो.

आर माधवनला शेती करायला देखील खूप आवडते. अशामध्ये त्याने आपल्या बाल्कनीमध्ये किचन गार्डनिंग केले आहे ज्यामध्ये त्याने अनेक भाज्या लावल्या आहेत. सोशल मिडियावर देखील तो आपल्या गार्डनिंगचे फोटो शेयर करत असतो. ज्यामध्ये तो बाल्कनीमध्ये भाज्या तोडताना दिसतो तर कधी फळ तोडताना दिसतो.

आर माधवनला लक्झरी कारची देखील खूप आवड आहे. याशिवाय तो बीएमडब्ल्यू के १५०० जीटीएल बाईकचा देखील मालक आहे ज्याची किंमत २४ लाख रुपये इतकी सांगितली जाते. याशिवाय त्याच्याजवळ डुकाटी डायव्हल आणि यामाहा व्ही-मॅक्स सारख्या बाईक्स देखील आहेत.

Leave a Comment