काही लोकांची अशी धारणा असते कि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार त्यांच्या फिल्मी करियरमुळे त्यांच्या शिक्षणाला जास्त महत्व देत नाहीत. पण फिल्म इंडस्ट्रीमधील असे काही कलाकार आहेत जे फिल्मी करियरमध्ये जितके यशस्वी आहेत तितकेच ते शिक्षणामध्ये देखील यशस्वी आहेत.
सुनील शेट्टी: सुनील शेट्टी यांचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी झाला होता. सुनील शेट्टी यांचे नाव बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. बलवान या चित्रपटामधून सुनील शेट्टी यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती.
त्यानंतर एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर ते काही दिवसांमध्ये सुपरस्टार बनले. अभिनयासोबत सुनील शेट्टी शिक्षणामध्ये देखील मागे नाहीत. त्यांनी मुंबई येथील एचआर कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतलेली आहे.
अभिषेक बच्चन: अभिषेक बच्चनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रिफ्युजी चित्रपटामधून केली होती. परंतु वडील अमिताभ बच्चन सारखे अभिषेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारसे यशस्वी होऊ शकला नाही. पण शिक्षणाच्या बाबतीत तो खूपच पुढे आहे.
त्याने अनेक शाळांमधून प्राथमीक शिक्षण घेतले त्यानंतर स्वित्झर्लंडमधील एगलॉन कॉलेजमधून त्याने उच्च शिक्षण घेतले आहे. बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये आर्ट्सचं शिक्षण घेत असताना काही कारणास्तव त्याला शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले.
शाहिद कपूर: २००३ मध्ये प्रदाशित झालेल्या इश्क विश्क चित्रपटामधून शाहिद कपूरने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला एक यशस्वी अभिनेता बनायला फार काळ लागला नाही. शाहिदने उडता पंजाब, हैदर आणि जब वी मेट सारखे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहिदचे चौथी पर्यंतचे शिक्षण दिल्लीमध्ये झाले आहे आणि त्यानंतर तो पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आला. मिठीबाई महाविद्यालयातून त्याने पदवी प्राप्त केली आहे.
सोनू सूद: अभिनयासोबतच आपल्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वासाठी आणि चॅरिटीसाठी ओळखला सोनू सूदने २००२ मध्ये शहीद आझम चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सोनू सूदने पंजाबमधील मोगा येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. तर त्याने नागपूरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे.