प्रसिद्ध ‘अभिनेत्री’सोबत फ्लाईटमध्ये घडला धक्कादायक प्रकार; ऐकून अंगावर शहारे येतील, बाथरूममध्येच…

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेसोबत फ्लाईटमध्ये असभ्य वर्तन झाल्याचे समोर आले आहे. फ्लाईटमध्ये असताना एअरलाइन्स कर्मचाऱ्याने तिच्यासोबत असभ्य आणि धमकीच्या स्वरामध्ये बोलल्याचा तिने आरोप केला आहे. अभिनेत्री पूजा हेगडेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.

पूजाने ट्विट करताच तिचे ट्विट काही वेळामध्येच तुफान व्हायरल झाले. त्यानंतर एअरलाइन्स कंपनीला पूजाची माफी मागावी लागली. पूजाने ट्विट करत लिहिले होते कि विपुल नाक्शे या इंडिगो एअरलाइन्सच्या स्टाफने मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाईटमध्ये आमच्यासोबत असभ्य वर्तन केले.

विनाकारण तो आमच्यासोबत अर्वाच्य आणि धमकावलेल्या स्वरामध्ये बोलत होता. यादरम्यान पूजाने हे देखील सांगितले कि मी सहसा असले ट्विट करत नाही पण नाईलाजाने मला ते करावे लागले. ते खूपच भयानक होते.

अभिनेत्रीने ट्विट करताच सोशल मिडियावर तिचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. यानंतर इंडिगोने तात्काळ कारवाई करत पुजाची ट्विट करून माफी मागितली. त्याचबरोर तिला आपला तपशील देखील शेयर करण्याचे आवाहन केले जेणेकरून तिच्यासोबत घडल्या प्रकारची संपूर्ण माहिती मिळू शकेल.

पूजाने ट्विट केल्यानंतर तिच्या ट्विटला रिट्विट करत अनेकांनी आपली मते देखील मांडली. अनेक लोकांनी भूतकाळामध्ये आपल्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल देखील सांगितले. यापूर्वी देखील असे घडले होते असे एका युजरने देखील लिहिले आहे. याचबरोबर अनेकांनी असे देखील लिहिले आहे कि पूजाने असे ट्विट करू नये कारण त्या स्टाफला नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.

Leave a Comment