प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्या आईचे प्रकृती बिघडल्याने नि’धन झाले आहे. याची माहिती त्यांनी स्वतः स्वतः सोशल मिडिया ट्विटर वरून शेयर करून दिली आहे. माहिती देताना सुधीर मिश्रा खूपच भावुक झाले होते.
सुधीर मिश्रा भावुक होत त्यांनी आपली व्यथा मांडली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, माझ्या आईचे निधन झाले आहे, ती आम्हाला एकटे सोडून गेली. तिच्या मृत्यूसमयी आम्ही म्हणजेच मी आणि माझी बहिण सोबत होतो. आम्ही आता अनाथ झालो.
सुधीर मिश्रा यांच्या आईच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या ट्विटनंतर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे सांत्वन केले.
My Mother passed away into the great beyond an hour ago . My Sister and I both held her hand as she went . I am now officially an orphan .
— Sudhir Mishra (@IAmSudhirMishra) June 13, 2022
आयुष्मान खुराना, अमृता राव ते मनोज बाजपेयी, फरहान अख्तर यांसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींसह टीव्हीवरील कलाकारांनी देखील सोशल मिडियाद्वारे शोक व्यक्त केला. सुधीर मिश्रा यांनी ट्विट केल्यानंतर त्यांच्या ट्विट वर मनोज वाजपेयी यांनी लिहिले कि,
देव तुम्हाला या कठीण काळामधून बाहेर पडण्याची शक्ती देवो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आयुष्मानने ट्विट करत कृपया स्वताची काळजी घ्या असे देखील लिहिले आहे. आमच्या सहानुभूती तुमच्यासोबत आहेत तुम्ही आई जिथे कुठे असेल तिथे आनंदी राहो.