बॉलीवूड ‘हाद रले’ ! ‘या’ दिग्गज चित्रपट निर्मात्याचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

उत्तर प्रदेशमधील ब्रज भूमि मथुरामधून मुंबईमध्ये आलेल्या आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध चित्रपट निर्माता केसी शर्मा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा अनिल शर्मादेखील फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहे. सध्या ते सुपरहिट चित्रपट गदर २ च्या दिग्दर्शनामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी आपल्या वडिलांद्वारे स्थापित फिल्म कंपनी शांतिकेतन फिल्म्ससाठी श्रद्धांजलि, हुकूमत आणि एलान ए जंग सारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

केसी शर्मा त्यांच्या काळामधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बीआर चोप्रा यांच्या ते खूप जवळ होते. त्यांच्या सांगण्यावरूनच ते मथुरा सोडून मुंबईला आले होते. बीआर चोप्रासोबत दीर्घकाळ काम केल्यानंतर त्यांनी शांतिकेतन फिल्म्स नावाची स्वतःची फिल्म कंपनी सुरु केली होती.

शांतिकेतन फिल्म्ससाठी त्यांनी श्रद्धांजलि, बंधन कच्चे धागों का, एलान ए जंग’ आणि हुकूमत सारखे सुपरहिट चित्रपट बनवले. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. ज्यामुळे ते एकाकी जीवन घालवत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती देखील ठीक नव्हती. कुटुंबियांचा निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार के सी शर्मा यांचे निधन शुक्रवारी रात्री ८ वाजता हृदयगती बंद पडल्यामुळे झाले. त्यांचे अंतिम संस्कार मुंबईच्या सांताक्रूझ स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

केसी शर्मा यांचा मुलगा अनिल शर्माबद्दल बोलायचे झाले तर ते देखील इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. अनिल यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक, गदर – एक प्रेम कथा चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटामध्ये अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेमध्ये होते.

लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. अनिल यांनी त्यांच्या करियरमध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, रजनीकांत, सलमान खान यांसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी अपने, वीर, अब तुम्हारे हवाले वतन साथी, महाराजा, माँ से ते सिंग साब द ग्रेट या चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले आहे.

Leave a Comment