प्रियांका चोप्राने शेयर केला मुलगी मालतीचा व्हिडीओ, चेहरा दिसणार होता कि अभिनेत्रीने केली अशी हरकत…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री नेहमी आपल्या मुलीचे फोटो शेयर करत असते. आता अभिनेत्रीने मालतीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती मस्ती करताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रा सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते आणि नुकतेच एक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आहे. पहिल्यांदाच प्रियांकाने आपल्या मुलीचा व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आनंदित केले आहे.

प्रियांका चोप्रा सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. अभिनेत्री नेहमी सोशल मिडियावर आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटोज आणि व्हिडीओ शेयर करत असते. यादरम्यान प्रियांकाने मुलगी मालतीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘ससुराल गेंदा फूल’ हे गाणे वाजलेले ऐकायला मिळत आहे. या गाण्यामध्ये मालती कॅमेऱ्याकडे वळणारच होती कि प्रियांकाने मुलीला थांबवले.

प्रियांका आणि निक यांनी त्यांची मुलगी मालतीचा चेहरा अजून दाखवलेला नाही. पण चाहत्यांच्या आनंदासाठी ते मालतीचा फोटो जरूर शेयर करतात. नुकतेच शेयर केलेल्या प्रियांकाच्या या व्हिडीओला चाहते खूपच पसंद करत आहेत. यावर्षी जानेवारीमध्येच प्रियांका सरोगसीद्वारे आई बनली होती. जन्माच्या नंतर मालतीला अनेक कॉम्पलीकेशन होते. जन्माच्या १०० दिवसानंतर ती घरी परतली होती.

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री द व्हाइट टाइगर चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती द मेट्रिक्स रेसररेक्शन्स या हॉलीवूड चित्रपटामध्ये दिसली होती. प्रियांकाच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती कॅटरीना कैफ आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय प्रियांकाच्या खात्यामध्ये सिटाडेल हॉलीवूड चित्रपट आणि अभिनेता एंथोनी मैकी सोबत एंडिंग थिंग्ज हा अॅक्शन देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Leave a Comment