अबब ! दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर २१ दिवसातच ‘हि’ अभिनेत्री राहिली पुन्हा प्रेग्नंट ? फ्लॉन्ट केले बेबी बंप…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री प्रियांका चोप्राची वहिनी सोफी टर्नर नुकतीच दुसऱ्यांदा आई बनली आहे. तर आता सोफीने आपल्या बेबी बंपसोबत एक फोटो शेयर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. सोफीचा हा फोटो सोशल मिडिया व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर लोक तिला शुभेच्छा देत आहेत, तर काही लोकांना वाटत आहे कि ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

सोफीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे, त्यामध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ब्लॅक क्रॉप टॉप आणि लेगिंग्ससोबत तिने ग्रे-ऑरेंज जॅकेट घातले आहे. सोफी आपले डोळे बंद करून एक स्मित हास्य करताना दिसत आहे. फोटो शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि ‘फुल ऑफ बेबी’. सोफी या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि लोक तिचे कौतुक देखील करत आहेत.

याशिवाय काही युजर्सला वाटत आहे कि ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट राहिली आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, मी तुझ्यासाठी खुश आहे सोफी, तर दुसऱ्याने लिहिले आहे कि बेबीज खाणे बंद कर सोफी. तर एका दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये विचारले आहे कि हा नवीन फोटो आहे का जुना आहे.

सोफीचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक खूपच कंफ्यूज झाले आहेत. अशामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो कि सोफीचा हा दुसऱ्या प्रेग्नंसीमधला अनसीन फोटो आहे जो तिने आता शेयर केला आहे. सोफी टर्नर आणि जो जोनसने २९ जून २०१९ रोजी लग्न केले होते.

दोघांना एक दोन वर्षाची मुलगी आहे जिचे नाव विला आहे तर जुलैमध्ये तिने आपल्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. सोफी हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि द गेम ऑफ थ्रोन्स साठी तिला ओळखले जाते आणि ती सिंगर तर आहेच त्याचबरोबर ती अभिनेत्री देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by S O P H I E T U R N E R (@sophiet)

Leave a Comment