बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी मुलगी मालती मेरीचे क्युट फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. यादरम्यान तिने पुन्हा एकदा मालतीसोबतचे काही अनसीन फोटो चाहत्यांसोबत शेयर केले आहे जे खूपच वेगाने व्हायरल होत आहे. प्रियांका आणि तिची मुलगी मालतीचे हे फोटो इतके क्युट आहेत कि सोशल मिडिया युजर्ससोबत अनेक सेलेब्स देखील तिच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
प्रियांका चोप्राने मालतीसोबत आपले दोन फोटो शेयर केले आहेत. ज्यामधील एका फोटोमध्ये ती आईच्या मांडीवर बसून पुलचा आनंद घेत आहे. प्रियांकाने मुलीचा आणखीन एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये मुलीचे छोटे छोटे पाय चाहत्यांना दिसत आहेत.
तथापि या दोन्ही फोटोंमध्ये या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ती आहे प्रियांका चोप्राच्या हातामध्ये असलेला काळा धागा आणि पायामध्ये दिसत असलेले काळ्या मोतींचे पैंजण आणि काळ्या मोतींपासून बनलेल्या या पैंजणामध्ये हार्ट शेपचे डिझाईन बनलेले आहे.
प्रियांकाने लिहिले आहे कि प्रेमासारखे काहीच नाही. पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिया मिर्जाने लिहिले आहे खरेच. तर तिची लहान बहिण परिणीती चोप्राने लिहिले आहे मला तिची आठवण येते. यासोबत करीना कपूर खानने प्रियांकाच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे, पीसी आणि तिच्या मुलीला मोठी मिठी. यासोबतच अनुष्का शर्मा, प्रीती झिंटा पासून दिया मिर्जाने प्रियांकाच्या या फोटोवर हार्ट इमोजी शेयर केला आहे.
प्रियांकाने सिद्ध केले आहे कि ती भलेहि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप व्यस्त आहे पण जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा ती त्यामध्ये काहीच कमी सोडत नाही. सध्या प्रियांका आपल्या मदरहुडला खूपच एन्जॉय करत आहे आणि हे तिचे फोटो देखील सांगतात.
View this post on Instagram
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर प्रियांका गेल्या काही काळापासून बॉलीवूडमध्ये कमबॅंक करण्याच्या तयारीमध्ये आहे. असे सांगितले जात आहे कि प्रियांका चोप्रा फरहान अख्तरचा पुढचा चित्रपट जी ले जरा मध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि कॅटरीना कैफ देखील तिच्यासोबत दिसणार आहेत.