प्रियांका चोप्रा २०२२ मध्ये सरोगेसी द्वारे आई बनली होती. अभिनेत्रीच्या घरी लक्षीचे आगमन झाले होते. प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसने मिळून छोटी परीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस असे ठेवले होते. मालतीच्या आगमनानंतर चाहते तिचा चेहरा पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक होते. आता चाहत्यांची आतुरता अनेक दिवसांनंतर संपली आहे.
प्रियांकाने एक पोस्ट शेयर करून मुलगी मालती मेरीचा चेहरा समोर आणला आहे. प्रियांका चोप्राने स्वतः मुलगी मालतीचा चेहरा रीवील केला आहे आणि प्रत्येकजण तिच्या क्युटनेस फिदा झाला आहे. चाहते, अभिनेत्रीने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये मालतीचा चेहरा पाहून प्रतिक्रिया देत आहेत.
हि क्लिप शेयर करत प्रियांका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मला तुझा खूप अभिमान आहे माझ्या प्रिय! @jonasbrothers चे अभिनंदन. प्रियांका चोप्राच्या पोस्टमध्ये एक फोटो देखील आहे. ज्यामध्ये मंचावर तीन जोनस ब्रदर्स आपल्या वॉक ऑफ फेम सर्टिफिकेटसोबत उभे आहेत.
व्हिडीओमध्ये निक जोनस हे म्हणताना पाहायला मिळत आहे, माझ्या सुंदर पत्नीसाठी, तू एक शांती आहेस, वादळामध्ये दगड आहेस आणि मी तुझ्यासोबत लग्न करून खूपच खुश आहे. हि सर्वात मोठी भेट आहे आणि मला तुझ्यासोबत पॅरेंट्स बनायला खूपच चांगले वाटले.
यानंतर निकने मुलगी मालतीकडे वेव करत म्हंटले कि मालती मेरी नमस्ते मी १५ वर्षाने पुन्हा इथे परत येईन. मी तुला माझ्या मित्रांसमोर शरमिंदा करण्याची वाट पाहू शकत नाही. हे ऐकल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि तिथे उपस्थित असलेले लोक हसू लागले.
View this post on Instagram