बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नन्सी फेजमध्ये आहे. प्रत्येकजण सोनम कपूरच्या पहिल्या अपत्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने आपला एक फोटो चाहत्यांसोबत शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने हे सांगितले आहे कि तिची प्रकृती खराब आहे.

फोटो शेयर करताना सोनम कपूरने जे कॅप्शन दिले आहे त्यावरून हे स्पष्ट होते कि अभिनेत्री जरा देखील चांगले फील करत नाही आहे. सोनम कपूरचा हा लास्ट प्रेग्नन्सी महिना आहे आणि अभिनेत्री याच महिन्यामध्ये आपल्या बाळाला जन्म देणार आहे.

सोनम कपूर आपल्या चाहत्यांसोबत आपल्या प्रेग्नंसी पीरियडची झलक नेहमी शेयर करताना दिसत असते. नुकतेच सोनम कपूर काही अशा कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे. सोनमने आपला एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती सांगताना दिसत आहे कि कशाप्रकारे प्रेग्नंसीमुळे तिच्या पायाला सूज आली आहे. सोनमचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर झोपलेली दिसत आहे आणि कॅमेरा खालच्या बाजूने करताना तिने आपल्या पायांचा फोटो घेतला आहे. फोटोमध्ये दिसत आहे कि तिने क्युट पायजमा घातला आहे आणि पायाला सूज दिसत आहे. हा फोटो शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, अनेकवेळा प्रेग्नंसी सुंदर नसते.

सोनम कपूरचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. इतर अनेक प्रेग्नंट महिलांनी देखील प्रेग्नंसी दरम्यान पायाला सूज येण्याचा अनुभव शेयर केला आहे. प्रेग्नंसी दरम्यान सोनम कपूरची काळजी तिचा पती घेत आहे. सोनम कपूर सोशल मिडियावर अनेकवेळा आपल्या पतीच्या मदतीबद्दल सांगत असते. सोनमच्या प्रेग्नंसीबद्दल तिचे संपूर्ण कुटुंब खूपच उत्सुक आहे आणि सर्वजण ड्यू डेटची वाट पाहत आहेत.

माहितीनुसार सोनमची डिलिव्हरी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कपूर कुटुंबाने लहान पाहुण्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. सोनम कपूरने जेव्हा आपल्या प्रेग्नंसीची अनाउंसमेंट केली होती तेव्हापासून संपूर्ण कुटुंब नवीन सदस्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या पहिल्या बाळाचा जन्म त्यांच्या आई-वडिलांच्या घरी होणार आहे. लग्नानंतर सोनम कपूर जास्तकरून आपल्या लंडनच्या घरीच राहिली आहे. आनंद आणि सोनमचे दिल्लीमध्ये देखील एक आलिशान घर आहे. माहितीनुसार सध्या ६ महिन्यांपर्यंत सोनम आपल्या आई-वडील म्हणजेच अनिल कपूरच्या घरी राहणार आहे. ज्यानंतर ती पतीसोबत लंडनला जाणार आहे. यावेळी सोनम कपूरजवळ अनेक चित्रपट आहेत ज्यावर ती आपल्या डिलिव्हरी नंतर काम करणार आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.