बाळाला जन्म दिल्यानंतर या अभिनेत्रीची अशी झाली अवस्था, डिलिव्हरी रूमचा व्हिडिओ आला समोर !

By Viraltm Team

Published on:

आई बनायचे सुख जगामधील सर्वात मोठे सुख मानले जाते. प्रेग्नंसीपासून ते डिलिवरीपर्यंत एका आईमध्ये अनेक भावना उफाळून येतात. याचा आनंद एक वेगळ्याच लेवलचा आनंद असतो. या आनंदाबद्दल साउथची अभिनेत्री आणि बॉलीवूड चित्रपटांमधील अभिनेत्री प्रणिता सुभाषने नुकतेच शेयर केले आहे. तिने आपल्या डिलिवरी रूममधील एक व्हिडीओ शेयर केला आहे जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हंगामा २ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री प्रणिताने ११ एप्रिल २०२२ रोजी आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तथापि ती याआधीच काही महिन्यांपूर्वी प्रेग्नंट राहिली होती. १० जून रोजी तिने एका मुलीला जन्म दिला होता. यानंतर १२ जूनला तिने आपल्या प्रेग्नंसीपासून ते डिलिवरीपर्यंतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचे चाहते खूपच आनंदी दिसत आहेत. ते अभिनेत्रीला कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कि प्रेग्नंट अभिनेत्री कसे आपली सोनोग्राफी करून घेते. नंतर पती तिच्या पोटाचे चुंबन घेतो. तिच्या पोटामधील बाळाची हालचाल देखील पाहायला मिळते. नंतर ती हॉस्पिटलमध्ये डिलिवरीसाठी जाते आणि शेवटी एका मुलीला जन्म देऊन तिला आपल्या जवळ घेताना पाहायला मिळते. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये प्रणिताने आपल्या संपूर्ण प्रेग्नंसीची जर्नी चाहत्यांना दाखवली आहे.

अभिनेत्रीने ३१ मे २०२१ मध्ये नितीन राजू या व्यावसायीकाशी लग्न केले होते. याआधी अभिनेत्रीने बेबी गर्लची झलक देखील दाखवली होती. यादरम्यान तिने सांगितले होते कि गेलेले काही दिवस माझ्यासाठी खूपच अद्भुत राहिले आहेत. खासकरून जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हापासून मी स्वतःला खूप लकी मानत आहे.

प्रणिता साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड, तेलगु, तमिळ चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. २०१० पासून ती चित्रपटांमध्ये काम करत आहे. पोरकी या कन्नड चित्रपटामधून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. नंतर ती बावा, अत्रीतिकी दरेडी आणि मासू इंगीरा मासिलामनी सारख्या हिट चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.

साउथमध्ये हिट झाल्यानंतर प्रणिताने २०२१ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिने हंगामा २ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शिल्पा शेट्टी आणि परेश रावल देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. तर अजय देवगणसोबत ती भूज चित्रपटामध्ये देखील दिसली होती. प्रणिता सध्या २९ वर्षांची आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment