रोहित शेट्टी हा बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. २००३ मध्ये ‘जमीन’ चित्रपटातून त्यांने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्याला खरी लोकप्रियता सिंघम, गोलमाल या चित्रपटांमधून मिळाली. लोकप्रिय झाल्यानंतर त्याने अनेक रिअॅलिटी शोजही होस्ट केले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
रोहित हा विवाहित आहे. २००९ मध्ये त्यांने माया शेट्टीसोबत लग्न केले होते. त्याला एक मुलगा इशान देखील आहे. मात्र, विवाहित असूनही रोहित आपल्या हिरोईनवर फिदा झाला होता. त्यांचे लव अफेयर इतके बदनाम झाले की त्याचे लग्न मोडण्याची वेळ आली होती. मात्र अखेरच्या क्षणी रोहितने परिस्थिती सांभाळली. खरंतर त्यांनी तो ज्या हिरोईनच्या प्रेमात वेडा झाला होता तिचं नाव प्राची देसाई आहे.
प्राची देसाई आणि रोहित शेट्टी यांचे अफेयर २०१२ मध्ये सुरू झाले होते. तेव्हा रोहित बोल बच्चन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, अजय देवगण, असीन, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्राची देसाई देखील होती. माहितीनुसार चित्रपटादरम्यान रोहित आणि प्राची एकमेकांच्या जवळ आले होते. दोघेही एकमेकांना डेट करू लागले.
दोघे एकत्र राहू लागले होते असे देखील म्हंटले जाते. एकत्र जेवायला जायचे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. लवकरच त्यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये रंगू लागल्या. प्रत्येकजण त्यांच्या अफेयरबद्दल बोलू लागला. शेवटी ही बातमी रोहितची पत्नी माया पर्यंत पोहोचली. तिला खूप राग आला. लग्न मोडण्याची वेळ आली होती. पण कुटुंब आणि मुलासाठी रोहितने प्राचीपासून स्वतःला दूर केले.
रोहित आणि प्राचीचे हे लव अफेयर फार काळ टिकले नाही. दोघांनीही लवकरच आपला वेगळा मार्ग निवडला. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनीही आजपर्यंत त्यांच्या अफेअरबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही. यानंतर प्राचीचे फिल्मी करिअरही काही खास राहिले नाही. ती रॉक ऑन, लाइफ पार्टनर , वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, बोल बच्चन आणि आई, मी और में सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र तिला म्हणावे तसे स्टारडम मिळू शकले नाही.
पत्नीला सोडून प्राची देसाईच्या प्रेमात पागल झाला होता रोहित शेट्टी, मोडणार होते लग्न, नंतर अशी वाचली इज्जत…
By Viraltm Team
Updated on: