साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार प्रभासची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. बाहुबली चित्रपटानंतर प्रभास जगामध्ये फेमस झाला. अजूनही त्याची क्रेज कायम आहे. लोक त्याच्यावर फिदा आहेत. हेच कारण आहे कि निर्माता प्रभासला आपल्या चित्रपटामध्ये घेण्यास उत्सुक असतो.
अगदी प्रभास म्हणेल तेव्हडी फीस द्यायला त्याला निर्माते नेहमी तयार असतात. प्रभासचे बाहुबली चित्रपटानंतर आलेले दोन चित्रपट फ्लॉप ठरले. साहो आणि राधेश्याम चित्रपटांनी दर्शकांची निराशा केली. पण तरीदेखील प्रभासची डिमांड काही कमी झालेली नाही.
प्रभास सध्या त्यांच्या आगामी येणाऱ्या सालार चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. आता प्रभासने अर्जुन रेड्डी’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव स्पिरिट आहे. विशेष म्हणजे प्रभासने या चित्रपटासाठी घसघशीत मानधन घेतले आहे.
माहितीनुसार हा चित्रपट करण्यासाठी प्रभासने तब्बल १५० करोड रुपये मानधन घेतले आहे. जर हि बातमी खरी ठरल्यास प्रभास भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा अभिनेता ठरणार आहे. आत्तापर्यंत शाहरुख, सलमान आणि अमीर खान यांना देखील इतकं मानधन मिळालेलं नाही.
प्रभासचा हा चित्रपट तेलगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, जपानी आणि कोरियाई भाषेमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. प्रभास सध्या सालारच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. शिवाय ओम राऊत यांच्या आदिपुरूष चित्रपटामध्ये देखील तो पाहायला मिळणार आहे. यामध्ये सैफ आली खान आणि कृती सेनन देखील प्रभास सोबत पाहायला मिळणार आहेत.
विशेष म्हणजे स्पिरिट चित्रपटासाठी प्रभास हा फर्स्ट चॉईस नव्हता. याआधी रामचरणला या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले होते. रामचरणने नकार दिल्यानंतर महेश बाबूला याबद्दल विचारण्यात आले होते. पण महेश बाबूने देखील हा चित्रपट नाकारला.
विशेष म्हणजे पुष्पा फेम अल्लू अर्जुनला देखील या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण त्याच्याकडून देखील नकार आल्याने या चित्रपटासाठी प्रभासची निवड करण्यात आली. सालार चित्रपटाची शुटींग पूर्ण झाल्यानंतर प्रभास या चित्रपटाचे काम सुरु करणार आहे.