इतका मोठा झाला आहे जूनियर जी मधील हा मुलगा, अ‍ॅक्टिंगच्या दुनियेपासून दूर करत आहे हे काम !

By Viraltm Team

Published on:

९० च्या दशकामध्ये जिथे एकीकडे शक्तिमान या सिरीयलने लोकांना वेड लागले होते तिथे दुसरीकडे जूनियर जी सुपरहिरो शक्तिमानला टक्कर देत होता. त्याकाळामध्ये या सुपरहिरोने चांगलाच धुमाकूळ माजवला होता आणि जूनियर जी ची भूमिका करणारा मुलगा रातोरात स्टार बनला होता.

हा शो त्याकाळी टॉपच्या शोमध्ये सामील होता. परंतु खूपच प्रसिद्धी मिळाल्यानंतर हा मुलगा अचानक गायब झाला आणि कोणालाही त्याची काहीच माहिती मिळाली नाही. सोशल मिडियावर देखील लोक त्याचा नेहमी शोध घेत असतात. पण आता हे माहित झाले आहे कि जूनियर जी ची भूमिका साकारणारा हा मुलगा सध्या कुठे आहे आणि काय करतो?जूनियर जी ची भूमिका अमितेश कोचरने साकारली होती आणि आता तो खूपच हैंडसम झाला आहे. अमितेश एक ट्रैवलर युट्यूबर आहे तो अनेक ठिकाणी फिरून व्हिडिओ ब्लॉग तयार करत असतो आणि युट्यूबवर टाकत असतो. अमितेश एक पॉप्युलर यूट्यूबर असून यूट्यूबवर त्याचे २ लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. अमितेश कोचरने स्वतःला जूनियर जी सांगितले आहे. ट्विटरवर आपल्याविषयी माहिती देताना त्याने Ex Junior G असे सुद्धा लिहिले आहे. ट्विटरवर @amiteshkochhar या नावाने त्याचे अधिकृत अकाऊंट आहे.अमितेशला कुत्र्यांविषयी खूप प्रेम आहे हे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन स्पष्ट होते. त्याच्या बऱ्याच व्हिडिओ आणि फोटोमध्ये आपल्याला डॉगी दिसतात. अमितेश आपल्या ह्या कामाचा पूर्णपणे आनंद घेतो. परंतु आता पुन्हा अभिनयाच्या दुनियेमध्ये जाण्याची त्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत.

Leave a Comment