गेल्या ४-५ वर्षांपासून आई बनण्याचा प्रयत्न करत असलेली अभिनेत्री मॉडेल पायल रोहतगी आता बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. सोशल मिडियावर तिने याची घोषणा केली आहे. बॉयफ्रेंड संग्राम सिंहसोबत फोटो शेयर करत तिने तारीख सेव करा असे लिहिले आहे.

पायलने तारीख फिक्स सांगितलेली नाही. पण हे जरूर लिहिले आहे कि त्यांचे लग्न जुलैमध्ये होणार आह. फोटोमध्ये कपल बॉक्सिंग रिंगमध्ये पाहायला मिळत आहे. ३७ वर्षांची पायल बॉयफ्रेंड संग्राम सिंहपेक्षा ८ महिन्याने मोठी आहे. पायल रोहतगी आणि संग्राम सिंह जवळजवळ १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांची पहिली भेट सर्वाइवर इंडिया या रियालिटी शोच्या सेटवर झाली होती. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अहमदाबाद येथे दोघांनी एंगेजमेंट केली होती.

नुकतेच पायल रोहतगी कंगना रनौतच्या लॉकअप शोची कंटेस्टेंट बनली होती. तेव्हा फॅमिली राउंडदरम्यान संग्राम सिंह देखील तिथे पोहोचला होता आणि दोघांनी लग्नासाठी एकमेकांना प्रपोज देखील केले.

दरम्यान पायल रोहतगीने खुलासा केला कि ती आई नाही बनू शकत. यामुळे तिने संग्राम सिंहला दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. पायलने म्हंटले कि मी मुल जन्माला घालू शकत नाही. मी विचार केला आहे कि लग्न तेव्हाच करणार जेव्हा मी प्रेग्नंट राहीन.

यामुळे मला मानसिक आणि शारीरिक रूपाने फिट राहावे लागेल. अभिनयावर फोकस करावा लागेल आणि आयुष्यामध्ये पुढे जात राहावे लागेल. प्रेग्नंट न होणे ठीक आहे. आम्ही ४-५ वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. यामुळे संग्रामला हे जाणून घ्यायचे आहे आणि मला वाटते कि त्याला माहिती आहे मी प्रेग्नंट होऊ शकत नाही. पायल पुढे म्हणाली कि मी IVF केले पण देखील सफल झाले नाही. यामुळे संग्रामला सांगते कि त्याने दुसऱ्यासोबत लग्न करावे जी मुल जन्माला घालू शकेल.

एका मुलाखती दरम्यान संग्रामने फॅमिली प्लानिंगवर भाष्य केले होते. त्याच्यानुसार त्यांना लवकरच पॅरेंट बनायचे आहे. तो म्हणाला कि आता लग्न होत आहे तर फॅमिली स्टार्ट करणारच. आमच्या पॅरेंटचे वय झाले आहे त्यामुळे आम्हाला लवकर मुले हवे आहेत.