जेव्हा एखाद्या धिकाणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा लोक त्या ठिकाणापासून जाणे बंद करतात आणि जेव्हा एखाद्या घरामध्ये एखाद्या अभिनेत्रीचा मृतदेह मिळतो तेव्हा विचार करा त्या घरामध्ये लोक राहण्याचा देखील विचार करू शकतात का ?

जुन्या काळामधील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी जी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती ती आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये एकटी पडली होती आणि हेच कारण होते जेव्हा अभिनेत्रीचा मृत्यू झाला तेव्ह याबद्दल माहित होता होता चार दिवस गेले होते आणि तेव्हापर्यंत तिचा मृतदेह सडू लागला होता. हि बातमी मिडियामध्ये अशी पसरली कि ज्या घरामध्ये परवीन बाबी राहत होती आता ते घर कोणीही घेण्यास तयार नाही.

परवीन बाबी एक अशी अभिनेत्री होती जिला आयुष्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मिळाले, तिचा स्टारडम फक्त देशामध्येच नाही तर विदेशामध्ये देखील होता. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते आणि बोल्डनेसच्या बाबतीत तर परवीनचा हात कोणीही पकडू शकत नव्हता. पण ती आपल्या करियरमध्ये जितकी सफल होती तितकेच तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये अडचणी आल्या.

परवीन बाबी नेहमीच खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिली पण तिच्या आयुष्यामध्ये नेहमीच एकटेपणा आला. करिश्मा उपाध्यायने आपल्या पुस्तकामध्ये लिहिले आहे कि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी परवीन दुध आणि अंड्यावर दिवस घालवत होती. कारण तिला भीती होती कि तिला कोणीतरी विष देईल.

परवीनच्या मृत्यूनंतर जेव्हा अनेक दिवस परवीनने दुध आणि रोजचे समान घेण्यासाठी दरवाजा उघडला नाही तेव्हा तिच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना सूचना दिली, दरवाजा उघडल्यानंतर अभिनेत्री मृत अवस्थेमध्ये अढळली. परवीन बाबी सिजोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिचा यासोबत रोज सामना व्हायचा.

असे म्हंटले जाते कि परवीन डायबिटीज आणि पायाचा आजार गँगरीनने देखील त्रस्त होती. ज्यामुळे तिची किडनी आणि शरीराचे अनेक अंग काम करायचे बंद झाले होते. मृत्यूच्या तीन दिवसांपर्यंत फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सडत होता आणि याच भयानक गोष्टी ऐकल्यानंतर तिच्या फ्लॅटमध्ये कोणी पाऊल देखील ठेवायला तयार नाही.

परवीन बाबीचा हा फ्लॅट मुंबईच्या अतिशय सुंदर ठिकाणी आहे. जुहू बीचवरील या फ्लॅटमधून समुद्र दिसतो. माहितीनुसार परवीन बाबी हा फ्लॅट विक्रीसाठी किंवा भाड्याने उपलब्ध आहे. सातव्या मजल्यावर असलेला हा टेरेस फ्लॅट आहे. हा फ्लॅट १५ कोटीला विक्रीसाठी उपलब्ध आहे किंवा ४ लाख रुपये महिन्याला भाड्याने देखील उपलब्ध आहे पण यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नाही.