ऋषभ पंतला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला पंजाबी गायक गुरु रंधावा, शेयर केले खास फोटो…पहा फोटोज…

By Viraltm Team

Updated on:

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका भयानक अपघाताचा शिकार झाला होता. त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि या कारणामुळे तो अनेक दिवसांपासून खेळापासून दूर आहे. पंत आगामी आयपीएल सीजन, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही.
या अपघातानंतर पंतची सर्जरी झाली आणि त्याला रिकवर होण्यास वेळ लागेल. अशामध्ये त्याच्या वाईट काळामध्ये स्टार पंजाबी सिंगर गुरु रंधावाने त्याची भेट घेतली, ज्याचे फोटो सोशल मिडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. गुरु रंधावाने पंतसोबतचे खास भेटीचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

फोटो शेयर करत रंधावाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आपल्या भावाला भेटून आनंद झाला, ऋषभ पंत लवकरच अधिक ताकदीने परतेल. या फोटोमध्ये ऋषभ पंत कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे आणि त्याच्या माथ्यावर टिळक लावलेला आहे.
चाहते देखील फोटोवर कमेंट करून त्याच्या लवकर बरे होण्याची कामना करत आहेत. त्याचबरोबर रंधावाच्या स्वीट जेस्चरचे खूपच कौतुक होत आहे. गुरु रंधावाच्या भेटीच्या अगोदर भारतीय टीमचे माझी दिग्गज खेळाडू त्याला भेटण्यासाठी पोहोचले होते. यामध्ये युवराज सिंह, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि एस श्रीसंत सारखे लीजेंड सामील होते. सुरेश रैनाने या भेटीचे फोटो शेयर करत प्रेमळ कॅप्शन लिहिले होते.

Leave a Comment