मार्केटमध्ये आल्या आहेत जींसने बनलेल्या २२ हजार रुपयांच्या विचित्र पँटी, जाणून घ्या याची खासियत !

By Viraltm Team

Updated on:

फॅशनच्या नावावर लोक सध्या काय घालतील याचा काही नेम नाही. तथापि हि फॅशन देखील आपल्या सर्वांची पसंतीची असते. एखाद्याला एक वस्तू चांगली वाटत असली तर इतरांना तीच वस्तू बकवास वाटते. आता या लेटेस्ट डेनिम अंडरवियरलाचा घ्या ना. आतापर्यंत डेनिम किंवा जींसची पँट आणि जॅकेट मार्केटमध्ये येत होत्या. पण आता फॅशन ब्रँड वाई प्रोजेक्टने डेनिम अंडरवियर बाजारामध्ये आणली आहे. या डेनिम पँटी त्यांनी महिलांच्या केटेगरीमध्ये लाँच केल्या आहेत. कंपनीने याला पँटी नाही तर जँटीज नावाने लाँच केले आहे.

या जँटीजला तुम्ही जींस आणि अंडरवियर अशा दोन्ही प्रकारामध्ये वापरू शकता. या जँटीज दोन रंग नेवी ब्लू आणि ब्लॅकमध्ये उपलब्ध केल्या आहेत. पहिला कंपनी मुलींमध्ये या जँटीजची क्रेज पाहू इच्छित आहे. जर हि पॉपुलर झाली तर याला मुलांसाठी देखील बनवले जाणार आहे. हि अनोख्या स्टाईलचे पँटी किंवा जँटीज म्हणा सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

याच्या पसंत आणि नापसंती नुसार जनता दोन गटामध्ये विभागली गेली आहे. काही लोकांना हि कल्पना खूपच आवडली आहे तर काही लोकांनी याला पाहताच क्षणी रिजेक्ट केले आहे. लोकांचे म्हणणे आहे कि हे पाहायला खूपच अश्लील वाटत आहे तर काहींनी हे देखील म्हंटले आहे कि हे वापरायला आरामदायक असणार नाही. तसे तर जींस घातल्यानंतर आपल्याला आरामदायक वाटत नाही अशामध्ये या जँटीजला दिवसभर कोण घालून राहू शकतो.

या जँटीजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आपल्या आपल्या खिशाला खूपच भारी पडू शकते. वाई प्रोजेक्ट कंपनीने याची किंमत २२ हजार रुपये इतकी ठेवली आहे. आता सामान्य अंडरवियर बद्दल बोलायचे झाले तर २२ हजार रुपयेमध्ये आपण खूप अंडरवियर खरेदी करू शकतो. तर जींसने बनलेली हि अंडरवियर २२ हजार रुपये खर्चून देखील फक्त एकच मिळेल.वाई प्रोजेक्ट कंपनी नेहमी अशा प्रकारचे युनिक आइडियाज असणारे कपडे लाँच करत असते. याआधी देखील त्यांनी डिटैचबल जींस बनवली होती. तेव्हा देखील त्यांची खूपच चेष्टा केली गेली होती. आता पाहण्यासारखी हि गोष्ट आहे कि जींसने बनलेल्या पँटी कोण खरेदी करतो. तसे तुम्हाला हि कल्पना कशी वाटली ? तुम्ही २२ हजार रुपये देऊन याला खरेदी करणे पसंत कराल ?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment