छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी २२ व्या वर्षी मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते. बोल्डनेसपासून ते स्टाईलच्या बाबतीत पलक तिवारीने सर्वांना मागे टाकले आहे. आता नुकतेच ती एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती जिथे ती खूपच बोल्ड आणि स्टायलिश लुकमध्ये पाहायला मिळाली. यादरम्यान तिची लेदर जीन्स तिच्यासाठी समस्या बनली ज्यामुळे ती पुन्हा पुन्हा वर ओढताना दिसली. यादरम्यान पलक थोडी अस्वथ झालेली पाहायला मिळाली.
वास्तविक पलक तिवारी रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी पोहोचली होती. यादरम्यान ती फॉक्स लेदर जींस आणि मारून कलरच्या स्टायलिश टॉपमध्ये दिसली. याशिवाय तिने आपल्या लुकला कंप्लीट करण्यासाठी स्वतःचे केस मोकळे सोडले होते. त्याचबरोबर बॅग देखील कॅरी केली होती आणि ब्लॅक स्ट्रीप सँडल घातली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
पण पलक जितकी ग्लॅमरस दिसत होती तितकीच ती अडचणीतही दिसली. वास्तविक तिची पँट पुन्हा पुन्हा खाली घसरताना दिसली. तसे तर पलकने मोठ्या आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ दिल्या. पण ती थोडी अस्वस्थही दिसली. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अनेक सोशल मिडिया युजर्सनी तिला ट्रोल केले तर अनेक युजर्स तिच्या लुकचे कौतुक करत आहेत. याआधी देखील पलक आपल्या पातळपणामुळे ट्रोल झाली आहे. अशामध्ये ती आता पुन्हा सोशल मिडिया युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका युजरने तिची खिल्ली उडवताना लिहिले आहे कि प्लीज थोडे जेवण जास्त करत जा.
पलक तिवारीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बिजली बिजली सारख्या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. याशिवाय पलक लवकरच सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram