मोहम्मद शमीच्या परिवारामध्ये आली एक लहान परी, फॅन्ससोबत शेयर केला आपला आनंद !

By Viraltm Team

Published on:

भारतीय संघाचा गोलंदाज शमी सध्या न्यूझीलंड दौऱ्यामध्ये व्यस्त आहे, जिथे तो फलंदाजांसाठी समस्या निर्माण करत आहे. पण यादरम्यान त्याच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शमीच्या कुटुंबामध्ये त्याचा मोठा भाऊ पिता बनला आहे. शमीच्या वाहिनीने एका लहान परीला जन्म दिला आहे ज्याचे फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर फॅन्ससोबत शेयर करत आनंद व्यक्त केला आहे.

शेयर केला फोटो :- शमीने मुलीचा फोटो शेयर करताना लिहिले आहे कि, माझ्या परिवारामध्ये आणखीन एका मुलीचा जन्म झाला आहे. गोड राजकुमारी तुला खूप खूप शुभेच्छा. तू लाडामध्ये आणि प्रेमामध्ये मोठी हो. या जगामध्ये तुझे स्वागत आहे. भावाच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.

आपल्या पत्नीसोबत राहतो वेगळा :- मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहांने २०१८ मध्ये मारपीट, रेप, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार असे गंभीर आरोप लावले होते. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां या दोघांमधील रिलेशनमुळे बराच काळ वाद सुरु होता. विवादानंतर दोघेही वेगळे झाले. हसीन जहांने व्हॉट्सअप स्क्रीन शॉटसोबत आपला पती शमीवर दुसऱ्या महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर तिने आपल्या पतीवर मॅच फिक्सिंगचा आरोप देखील केला होता.शमीसोबत हसीनने केला होता धोका :- शमीसोबत हसीन जहांने मोठा धोका केला होता. हसीनने शमीसोबत दुसरे लग्न केले होते, याची माहिती शमीला नव्हती. हसीनचे पहिले लग्न २००२ मध्ये एसके सैफुद्दीन नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. सैफुद्दीनने हसीन जहांला तेव्हा प्रपोज केले होते जेव्हा ती दहावीमध्ये शिकत होती. या लग्नापासून तिला दोन मुली झाल्या. हसीन जहांचे पहिले लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि २०१० मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाला. यानंतर शमी आणि हसीनची पहिली भेट IPL २०१२ मध्ये झाली होती. तेव्हा हसीन जहां चीयर गर्लचे काम करत होती. हसीन जहां जेव्हा पहिल्यांदा शमीला भेटली तेव्हा दोन वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले.

Leave a Comment