आताचा काळ हा ब्रेकिंग न्यूजचा काळ आहे. या ब्रेकिंग न्यूजच्या काळामध्ये हॉट आणि ग्लॅमरस न्यूज रिपोर्टर आपल्याला पाहायला मिळतात तर तितकेच उत्कृष्ठ न्यूज स्टुडीओदेखील आहेत. विशेष म्हणजे न्यूज साठी धावपळ करणारे न्यूज रिपोर्टर आणि आरडाओरडा करणारे न्यूज लीडर आपण नेहमी न्यूज चँनेल वर पाहत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का कि जे जुने न्यूज रिपोर्टर होते ते आता कसे दिसतात? जे दररोज आपल्याला न चुकता बातम्या देत होते.सलमा सुल्तान :- १६ मार्च रोजी जन्म झालेल्या सलमा सुल्तानने सुरवातीला टीव्ही पत्रकार म्हणून दूरदर्शनमध्ये काम केले. त्यांनी १९६७ पासून १९९७ पर्यंत नियमितपणे ३० वर्षे न्यूज रिपोर्टर म्हणून काम केले. सलमा सुल्तानच्या साडीचा एक विशिष्ठ पद्धतीचा पेहराव होता. आणि त्याचबरोर त्या एक गुलाबाचे फुल आपल्या डाव्या कानाखाली लावत होती. आणि हीच त्यांची एक ओळख बनून गेली. सलमा सुल्तानने १९८४ मध्ये पहिल्यांदा इंदिरा गांधींच्या हत्येची बातमी आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवली होती. न्यूज रिपोर्टर म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी दूरदर्शनवरील काही सिरियल्स साठी दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले. यामध्ये पंचतंत्र, सुनो कहानी, स्वर मेरे तुम्हारे आणि चलते सवाल हे नावाजलेले कार्यक्रम होते.नीति रवीन्द्रन :- १९८० ते १९९० मध्ये काम करणाऱ्या नीति रवीन्द्रनचा आवाज सर्वांना बांधून ठेवण्यास सक्षम होता. नीति इंग्रजी न्यूज रिपोर्टर होती आणि त्यांचे इंग्रजी उच्चारण खूपच उत्तम होते. जे त्यांच्या प्रसिद्धीचे प्रमुख कारण होते. विदेश मंत्रालयासाठी बनवल्यागेलेल्या वृत्तचित्र 50 Years of Independence च्या मागे त्यांचाच हात होता. ज्यासाठी नंतर त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.शम्मी नारंग :- शम्मी नारंगने आपल्या दमदार आवाज आणि प्रतिपादनाने बातमी वाचण्याचा स्तर खूपच उंचावला. ते आपल्या बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. त्यांनी मेट्रोलोजिकल इंजिनिअरिंगमधून स्नातकोत्तरची पदवी प्राप्त केली होती. याशिवाय त्यांनी व्होईस ऑफ अमेरिकासाठी व्होईस ओव्हर आर्टिस्टचे काम देखील केले. दूरदर्शवर त्यांनी १०००० प्रवेशार्थिना मागे टाकून न्यूज रिपोर्टर म्हणून प्रवेश केला होता. त्यांनी २० वर्षे दूरदर्शनसाठी काम केले.मंजरी जोशी :- १९ मार्चला कानपूरमध्ये जन्म झालेल्या मंजरी जोशीचेसुद्धा न्यूज रीडिंगमध्ये उल्लेखनीय योगदान राहिले आहे. त्या केमिस्ट्री स्नातक आहेत. सध्या त्या टीव्ही, जर्नलिस्टच्या विध्यार्थ्यांना ट्रेनिंग देतात.सुनीत टंडन :- खूप कमी कालावधीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुनीत टंडन २००७ पर्यंत दूरदर्शनसोबत जोडले गेले. सध्या इंडिअन इंस्टीट्युट ऑफ मास कम्युनिकेशन इंडस्ट्रीचे ते डायरेक्टर जनरल आहेत. याआधी ते लोकसभा टीव्हीचे सीईओदेखील राहिले आहेत.अविनाश कौर सरीन :- अविनाश कौर सरीन त्याकाळी इतर न्यूज रिपोर्टरपेक्षा खूप वेगळी होती कारण त्यांचा चेहरा नेहमी हसमुख आणि कपाळावर एक मोठी बिंदी लावलेली असायची.सरला महेश्वरी :- सरला महेश्वरी आपल्या संयमी स्वभावामुळे आणि अचूक उच्चारामुळे ओळखली जात होती. १९७६ मध्ये त्यांनी दूरदर्शनसोबत आपल्या करियरची सुरवात केली. १९८२ मध्ये त्यांनी न्यूज रीडिंगचे काम केले. १९८४ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्या इंग्लंडला निघून गेल्या. तिथे त्यांनी काही काळ बीबीसी सोबतसुद्धा काम केले. १९८८ मध्ये त्या पुन्हा भारतात परतल्या आणि त्यांनी न्यूज रीडिंगचे काम सुरु केले.शोभना जगदीश :- शोभना जगदीशसुद्धा दूरदर्शनवरची खूपच प्रसिद्ध न्यूज रीडर राहिली आहे. बराच काळ दूरदर्शनसोबत काम करणाऱ्या शोभना जगदीशने खूपच कमी कालावधीमध्ये दर्शकांवर आपली एक वेगळी छाप पाडली.वेद प्रकाश :- वेड प्रकाश हे दूरदर्शनवरील सर्वात परिचित न्यूज रीडर होते. त्याचबरोर त्यांनी व्होईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम केले आहे. बऱ्याच मासिकांसाठी आणि न्यूजपेपर साठी त्यांनी लिखाणसुद्धा केले आहे. याशिवाय त्यांनी स्टुडंट टुडेच्या संपादक पदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.
दूरदर्शनचे हे जुने न्यूज रिपोर्टर आता इतके बदलले आहेत, ओळखणे देखील आहे कठीण !
By Viraltm Team
Updated on: