फक्त ५००० रुपये घेऊन नशीब आजमावण्यासाठी भारतात आली होती नोरा फतेही, टॅलेंटच्या बळावर बनली भारतातील नंबर वन आयटम गर्ल…

By Viraltm Team

Published on:

नोरा फतेही बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच कमी काळामध्ये एक अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे जिच्या सुंदर अदांवर लोक फिदा होत आहेत. या सुंदर अभिनेत्रीच्या ठुमक्यावर लोक नाचताना पाहायला मिळतात आणि प्रत्येक चित्रपटामध्ये नोरा फतेहीचे आयटम साँग ऐकायला मिळते.

मलायका अरोराला देखील कमी काळामध्ये नोरा फतेहीने मागे टाकले आहे पण नोराला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला कारण हे सर्व मिळवणे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते. नोरा फक्त ५००० रुपये घेऊन आपले नशीब आजमावण्यासाठी भारतात आली होती आणि आज ती करोडो रुपयांची मालकीण आहे.

नोरा फतेही मुळची कॅनडाची आहे. कॅनडा सोडून ती जेव्हा भारतात आली होती तेव्हा तिला एका एजेंसीमध्ये काम मिळाले होते. जिथे तिला ३००० रुपये पगार मिळत होता. यादरम्यान तिने मॉडलिंग देखील सुरु ठेवली होती आणि नोराने सांगितले कि सुरुवातीला तिला खूप संघर्ष करावा लागला कारण तिचा डांस पाहून तिचे को-स्टार तिची खिल्ली उडवायचे.

अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डांसर म्हणून नोराला काम मिळू लागले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एका मोठ्या चित्रपटाने नोराचे नशीब पालटून टाकले. ज्यामुळे तिची लोकप्रियता हळू हळू वाढू लागली. प्रभासचा सुपरहिट चित्रपट बाहुबलीमध्ये नोरा फतेहीने मनोहारी गाण्यामध्ये आपल्या उत्कृष्ट नृत्याने लोकांचे मन जिंकले होते आणि इथूनच नोरा फतेहीला खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटानंतर तिने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले.
आज प्रत्येकजण नोरा फतेहीची सुंदरता पाहून हेच म्हणतो कि आजच्या काळामध्ये नोरा फतेही सारखी प्रतिभाशाली अभिनेत्री दुसरी नाही. २०२३ मध्ये देखील नोरा फतेहीने आपल्या अदांची जादू दाखवली. आता प्रत्येकाचे हेच मानणे आहे कि येणाऱ्या काळामध्ये नोरा फतेही बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ राज्य करेल कारण ती याची हकदार आहे

Leave a Comment