नोरा फतेहीला बॉलीवूड कोण नाही ओळखत. कारण नोरा बॉलीवूडमधील नामी अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत नोराने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नोराला बॉलीवूडमध्ये खूप काळ झाला नसला तरी तिने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
आजच्या काळामध्ये असा कोणताही व्यक्ती नसेल जो नोराला ओळखत नसेल. नोरा एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक उत्कृष्ट डांसर देखील आहे. नोराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत राहतात.
नुकतेच नोराने एक मोठे वक्तव्य केले आहे ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. नोरा म्हणाली कि तिला सैफ अली खानचा मुलगा खूप आवडतो आणि त्याच्यासोबत तिला लग्न देखील करायचे आहे. सैफ अली खान बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे.
सैफ अली खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याला पहिल्या बायकोपासून दोन मुले आहेत ज्यांची नावे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी आहेत आणि दुसरी पत्नी करीना कपूरपासून देखील दोन मुले आहेत ज्यांची नावे तैमूर आणि जहांगीर अली खान अशी आहेत.
सध्या सैफ अली खान नोरा फतेहीने केलेल्या वक्तव्यामुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. तिची इच्छा आहे कि तिला सैफ अली खानच्या मुलासोबत लग्न करायचे आहे. नोराने सैफच्या ज्या मुलाचा उल्लेख केला आहे त्याचे नाव तैमूर अली खान आहे जो करीना कपूरचा मुलगा आहे. नोरा म्हणाली कि तैमूर खूपच क्यूट आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे.