अभिनेत्री आणि डांसर नोरा फतेहीला सध्याचा पाऊस फारसा पाहायला मिळत नसल्याचे दिसते आहे. नोरा सध्या एका डांस शोला जज करत आहे. पण मुंबईच्या पावसामध्ये नोराची चांगलीच फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नोराला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे.
अल्पावधीच नोरा बॉलीवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रींच्या पंक्तीमध्ये जाऊन बसली आहे. तिच्या डांस स्किल्सचीच चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. तिचा फॅशन सेन्स देखील कमालीचा असतो. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती प्रत्येक आऊटफिटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेते.
सध्या नोराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती गुलाबी साडी घातलेली पाहायला मिळत आहे. पण मुंबईच्या पावसामध्ये तिला साडी सावरता सावरता नाकीनऊ आल्याचे दिसून आले. आपली साडी सावरण्यासाठी तिला बॉडीगार्डची मदत घ्यावी लागली.
त्यामुळे तिला चांगले ट्रोल केले जात आहे. व्हिडीओमध्ये ती गाडीमधून उतरताना दिसत आहे. नोराने साडी घातल्यामुळे तिला धड व्यवस्थित चालता देखील येत नाहीय. त्यामुळे तिची साडी सावरण्यासाठी तिचा बॉडीगार्ड समोर येतो तर दुसरा बॉडीगार्ड तिच्यासाठी छत्री घेऊन उभा आहे.
मुसळधार पावसामध्ये बॉडीगार्ड भिजत असल्यामुळे नोरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तू कुठली महाराणी लागून गेली का असे देखील तिला काही युजर म्हणत आहेत. धड तुला स्वतःची साडी देखील सावरता येत नाही. दुसऱ्याने भिजत असले तरी तिला मदत करायची.
असे कपडे सावरता येत नाहीत तर मग घालायचेच कशाला.. असे म्हणत एका युजरने तिला चांगलेच निशाण्यावर घेतले आहेत. काही लोकांनी त्या भिजणाऱ्या बॉडीगार्डची बाजू घेत तिला चांगलेच खडसावले आहे. त्या बॉडीगार्डचा तर विचार कर जो तुला भर पावसात मदत करत आहे असे देखील काही लोक तिला म्हणाले.
नोराचा हा पिंक साडीमधला लुक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डांस रियालिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. नोरा सध्या नीतू कपूर यांच्या दिवाने ज्युनियर्स नावाचा रियालिटी शो जज करत आहे. मुंबईमध्ये सुरु असलेल्या जोरदार पावसाने नोराच्या लुकची पुरती वाट लावल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram