टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री निशा रावलने करण मेहरावर अनेक आरोप लावले होते. ज्यानंतर करणला जेल देखील जावे लागले होते. अनेक दिवस हा वाद सुरु होता. पण शेवटी निशा रावल तिचा मुलगा कवीशला घेऊन वेगळे राहू लागली होती. ये रिश्ता क्या कहलाता है फेम करण मेहराने यावेळी पत्नी निशा रावलला एक्स्पोज केले आहे.

करणचे म्हणणे आहे कि निशा आपल्या लव्हरसोबत तिच्याच घरामध्ये राहत आहे, जिथे निशा आणि तिचा मुलग राहतात. करणने निशावर प्रश्न उपस्थित करत म्हंटले कि कवीशसोबत अशाप्रकारे त्या व्यक्तीचे राहणे अनेकप्रकारे मॉरली शंका उत्पन्न करण्यासारखे आहे.

करणने मिडियामध्ये पत्नी निशा रावलला एक्स्पोज करताना म्हंटले कि निशा कोणीतरी रोहित साटिया नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. अनेक दिवस तो आमच्यासोबत होता. निशाने त्याची ओळख मानलेला भाऊ म्हणून करून दिली होती. तिचे म्हणणे होते कि तिचे कन्यादान त्यानेच केले होते. मला समजत नव्हते कि हे सर्व कधी झाले.

करण मेहराने हे देखील सांगितले कि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील मिळत आहे. ते कोणते लोक आहेत माहित नाही. ईमेल द्वारे करणने हि माहिती दिली आहे. त्याने याविरुद्ध तक्रार देखील दाखल केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये निशा रावलने करण मेहरासोबत आपले भांडण पब्लिक केले होते. करण मेहरावर निशाने आरोप लावले होते कि त्याचे कोणासोबत तरी अफेयर सुरु आहे. तो नेहमी शुटींगचे निमित्त सांगून त्या महिलेला भेटायला जातो.

यासोबत निशा रावलने करण मेहरावर घरेलू हिंसेचा देखील आरोप लावला होता. निशाचा एक फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यामधून रक्त येताना दिसले होते. करणला या प्रकरणामध्ये अटक देखील झाली होती. पण नंतर त्याचा जमीन मंजूर झाला होता.