२००४ मध्ये नेहा धुपिया म्हणाली होती कि एकतर से क्स विकतो किंवा शाहरुख खान. नेहा धुपियाने हि गोष्ट २००४ मध्ये आलेल्या जुलीमध्ये केलेल्या इंटीमेट सीन्सबद्दल एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हंटले होते. या चित्रपटामध्ये नेहा धुपियाने एक से क्स वर्करची भूमिका केली होती आणि यामध्ये तिने अनेक इंटीमेट आणि बोल्ड सीन दिले होते. आता नेहा धुपियाचे हे विधान पुन्हा चर्चेमध्ये आले आहे.
नेहा धुपिया नुकतेच शाहरुख खानच्या पठाण चित्रपटामध्ये दिसली होती. ज्यानंतर तिचे विधान अचानक पुन्हा चर्चेमध्ये आले आहे. नेहा धुपियाने ट्विटरवर शाहरुख खान आणि त्याच्या चित्रपटाचे कौतुक केले होते. एका युजरने ट्विटरवर नेहा धुपियाला टॅग करत लीह्ले आहे कि जवळ जवळ दोन दशकांपूर्वी नेहा धुपियाने हि गोष्ट म्हंटल होती कि एकतर से क्स विकतो किंवा शाहरुख खान. हि गोष्ट पूर्णपणे सत्य आहे.
या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना नेहा धुपियाने म्हंटले कि आज २० वर्षानंतर देखील माझे हे विधान सत्य आहे. हे एका अभिनेत्याचे करियर नाही तर एका राजाचे साम्राज्य आहे. नेहा धुपियाबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळी जे विधान तिने केले होते तेव्हा तिने बातचीत दरम्यान म्हंटले होते कि जुलीमध्ये काही लव मेकिंग सीन आहेत ज्यामध्ये माझी पाठ दाखवण्यात आली आहे. से क्स सिम्बॉल टॅग काहीच फरक पडत नाही.
नेहा धुपियाने म्हंटले कि मला याने काहीच फरक पडत नाही जेव्हा लोक मला म्हणतात कि जुलीमध्ये आपल्या बोल्ड सिन्सने मी मल्लिका शेरावत आणि बिपाशा बसूला मागे टाकले होते. कारण आजच्या काळामध्ये एकतर से क्स विकतो किंवा शार्हुख खान. तर मी कदाचित पुढच्या पाच चित्रपटांमध्ये से क्स प्रॉप बनून समोर येऊ शकतो.