बॉलीवूड अभिनेत्री नीतू चंद्राने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तिला एक विचित्र ऑफर मिळाली होती. एका मुलाखती दरम्यान तिने या विचित्र घटनेबद्दल सांगितले आहे. तिने म्हंटले कि एका मोठ्या व्यावसायीकाने तिला आपली वेतनभोगी पत्नी बनण्यासाठी ऑफर दिली होती.
यासाठी तिला २५ लाख रुपये महिन्याला मिळणार होते. एका नवीन मुलाखतीदरम्यान नीतूने म्हंटले होते कि १३ नॅशनल अवॉर्ड विनर्ससोबत काम केल्यानंतर देखील तिच्याजवळ ना पैसे होते ना काम होते. अनेक दिवस ती बेरोजगार राहिली होती.
बॉलीवूड अभिनेत्री नीतू चंद्राने एका ऑडिशन दरम्यानचा एक अनुभव देखील शेयर केला जेव्हा एका फेमस कास्टिंग डायरेक्टरने तिला एका तासाच्या आतमध्येच रिजेक्ट केले होते. नीतूने बॉलीवूडमध्ये गरम मसाला चित्रपटामधून एंट्री केली होती. हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला होता.
चित्रपटामध्ये तिने एका एयर होस्टेसची भूमिका केली होती. तिने तेव्हापासून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओए लकी लकी ओए, अपार्टमेंट, १३ बी सारख्या हिट चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका केल्या आहेत.
तिचा शेवटचा चित्रपट कुछ लव जैसा होता ज्यामध्ये ती शेफाली शाह, राहुल बोस आणि सुमीत राघवनसोबत दिसली होती. ओए लकी लकी ओए चित्रपटाने सर्वश्रेष्ठ लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जिंकला होता. नीतूच्या मिथिला माखन चित्रपटाने देखील राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता.
एका मुलाखती दरम्यान नीतू चंद्राने आपल्या वेदना व्यक्त केल्या होता. म्हणाली होती कि माझी स्टोरी एक सफल अभिनेत्रीची असफलतेची निशाणी आहे. १३ राष्ट्रीय पुरस्कार विजेती असून देखील मोठ मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री नीतू चंद्राजवळ आज कोणतेही काम नाही.
मला एका मोठ्या व्यावसायिकाने म्हंटले होते कि मला प्रत्येक महिन्याला २५ लाख रुपये देतो, जर मी त्याची पगारावर पत्नी होण्याची अट स्वीकारली तर. त्यावेळी माझ्याजवळ पैसे नव्हते ना कोणतेही काम नव्हते. मी खूपच अडचणीत होते, इतके काम करून देखील मला अनवांटेड फील होत आहे.
नीतू चंद्राने पुढे सांगितले कि एका कास्टिंग डायरेक्टरने जो खूप मोठा फेमस व्यक्ती आहे मी त्याचे नाव घेणार नाही. ऑडिशनच्या वेळीच अवघ्या एका तासामध्ये म्हंटले होते कि, मला वाईट वाटते नीतू पण हे काम तू करत नाही आहेस. तुम्ही खरेच माझी ऑडिशन घेतली जेणेकरून माझा कॉन्फिडेंस तोडू शकाल.
नीतूने नेवर बॅक डाउन: रिवोल्ट म्हणून हॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. तिने आणखी दोन प्रोजेक्ट साईन केले आहेत. तथापि याची घोषणा होणे बाकी आहे. याआधी नीतूने म्हंटले होते कि सर्व काही बदलले आहे आणि हे बदलल्या दिवसांनुसार बदलत आहे. हि एक सतत चालणारी प्रोसेस आहे.
View this post on Instagram
चंद्रा म्हणाली कि मला एक गोष्ट शेयर करायची आहे जी लोकांना पचेल का माहिती नाही. मी हि भूमिका माझ्या हिम्मतीवर मिळवू शकते. बॉलीवूडमधील मोठे सेलेब्रिटी हि गोष्ट मानू शकत नाहीत कि कोणत्याही बॅकअप किंवा बॅकग्राउंड शिवाय तिकडे जाऊन कोणतीही इंडियन अभिनेत्री मुख्य भूमिका देखील मिळवू शकते. ते यावर विश्वास नाही करत.