नॅचरल माऊथ फ्रेशनर आणि दातांसाठी वरदान आहे कडुनिंबाची काडी, जाणून घ्या याचे फायदे !

By Viraltm Team

Published on:

भारतामध्ये प्राचीन काळापासून दात साफ करण्यासाठी अनेक पारंपारिक पद्धती वापरल्या जातात. यामधीलच एक आहे कडुनिंबाच्या काडीचा वापर. तसे तर दात घासण्यासाठी इतर अनेक झाडांच्या काडीचा वापर केला जाऊ शकतो. पण कडूनिंब, बोर आणि बाभळच्या काड्यांनी दात साफ करणे खूपच फायदेशीर असते.

तसे तर सध्या दातांना मजबूत बनवण्याचा दावा करणारे अनेक टूथपेस्ट आणि हर्बल टूथपेस्ट बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण औषधी गुणांनी भरपूर असलेल्या या झाडांचे वेगळेच फायदे आहेत. या काड्यांचा हा देखील फायदा आहे कि याद्वारे आपण दात तर साफ करू शकतोच पण त्याचबरोबर जीभ देखील साफ करू शकतो. अशामध्ये तुम्ही देखील जाणून घ्या कि कोणत्या काड्यांपासून कोणते फायदे मिळतात.

कडुलिंबाची काडी :- कडुलिंबाचा उपयोग जुन्या काळापासून केला जात आहे. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला खूपच फायदेशीर सांगितले गेले आहे. असे मानले जाते कि कडुलिंबाच्या काडीपासून दात साफ केल्यास दात स्वच्छ आणि मजबूत राहतात, याच्या वापराने पाचन क्रिया देखील सुधारते.

बोराची काडी :- असे मानले जाते कि बोराच्या झाड्याच्या काडीपासून दात साफ करणे खूपच फायदेशीर असते. याच्या वापराने गळ्यामधील खवखव देखील दूर होते आणि आपला आवाज देखल साफ राहण्यास मदत मिळते.

बाभूळाची काडी :- कडूलिंब आणि बोराच्या काडीशिवाय लोक बाभूळाची काडी देखील दात साफ करण्यासाठी वापरतात. असे म्हंटले जाते कि बाभूळाची काडी दात साफ करण्याशिवाय हिरड्या स्वच्छ आणि मजबूत बनवण्यासाठी देखील मदत करते.

दात घासण्याचे फायदे :- असे मानले जाते कि जर तुम्ही नियमितपणे दात घासत असाल तर दातांमध्ये कीड लागत नाही. यामागे हे मुख्य कारण आहे आहे अशा काड्यांपासून दात घासणे पूर्णपणे नैसर्गिक आणि किटाणुनाशक असते आणि यामुळे चांगल्या प्रकारे दात आणि जीभ साफ होते. अशामध्ये दातांची किडीपासून सुरक्षा होते.

हिरड्या मजबूत बनवते :- कडुलिंबाची काडी दात घासण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. यामागे हे कारण आहे कि कडुलिंबाच्या काडीपासून नियमित दात साफ केल्यास हिरड्यांमध्ये मजबूत येते आणि दात साफ राहतात.

दातांची समस्या दूर होते :- आजच्या बदलत्या लाईफस्टा‍ईलमध्ये काहीही आणि केव्हाही खाणे दातांसाठी नुकसानकारक असते. अशामध्ये दातांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात. अशामध्ये पायरीया समस्या होणे देखील सामान्य आहे. पण अशाप्रकारे दात साफ केल्यास या समस्यांपासून दूर राहिले जाऊ शकते.

नॅचरल माऊथ फ्रेशनर :- याशिवाय या काड्या नॅचरल माऊथ फ्रेशनर म्हणून देखील काम करतात. खासकरून कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास तोंडातून येणारी दुर्गंधी नाहीशी होते. ज्या लोकांच्या तोंडामधून दुर्गंधी येते त्यांच्यासाठी हा खूपच फायदेशीर उपाय आहे. यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात साफ करावे.

Leave a Comment