बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दल छोटीशी माहिती देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यांच्या आवडत्या कलाकाराची लाइफस्टाइल काय आहे, त्याला खायला काय आवडते, त्यांना फिरायला कोणती जागा आवडते, त्यांचे शिक्षण कुठे झाले आणि लहानपणी ते कसे दिसत होते. अशाप्रकारच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
अशा जर त्यांच्या लहानपणीचा फोटो समोर आला तर त्याला ओळखण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. दरम्यान सोशल मिडियावर अशाच एका बॉलीवूड कलाकाराचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक त्याचे नाव गेस करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोशल मिडियावर सध्या हा फोटो खूपच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा ताजमहालच्या समोर स्टाइलमध्ये बसलेला पाहायला मिळत आहे. ब्लॅक अँड व्हाईट असलेला हा फोटो खूपच जुना आहे. तथापि हा फोटो स्टूडियोमध्ये आहे ज्याच्या बॅकग्राउंडमध्ये ताजमहालचे पोस्टर आहे.
तुम्ही या लहान मुलाला ओळखू शकला का. जर नाही तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. सध्या हा मुलगा सर्वांचा फेवरेट हिरो आहे. अजून देखील ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो हा मुलगा कोण आहे. ताजमहालच्या पुढे बसलेला हा लहान मुलगा नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा लहानपणीचा फोटो आहे ज्यामध्ये तो खूपच क्युट दिसत आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलीवूडमधील एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीला ऑफ वासेपूर, बजरंगी भाईजान, किक, रईस, रमन राघव, मांझी, मोतीचूर चकनाचूर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. लवकरच नवाजुद्दीन टिकू वेड्स शेरू मध्ये अवनीत कौरसोबत पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram