Tutorials Point

कॉफी विथ करण शो प्रत्येक आठवड्याला एका नवीन एपिसोडसोबत येत असतो ज्यामध्ये बॉलीवूड चाहत्यांचा चांगलीच गॉसिप मिळते. लेटेस्ट एपिसोडमध्ये फोन भूत चित्रपटाची कास्ट कॅटरीना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी हजेरी लाली होती. एपिसोडमध्ये खूपच मजा मस्ती झाली. चाहत्यांनी देखील खूप एन्जॉय केला. एपिसोडमध्ये अनेक रंजक खुलासे देखील पाहायला मिळाले. ज्यामधील एक अमिताभ बच्चनच्या नाती संबंधी खुलासा आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल.

शोदरम्यान नेहमीप्रमाणे करण जौहर होस्ट करताना दिसला. करणने आपल्या गेस्ट्सला त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले. जिथे कॅटरीनाचे लग्न झाले आहे तर सिद्धांत आणि ईशान या प्रश्नापासून दूर जाऊ शकले नाहीत. ईशानने कन्फर्म केले कि तो अनन्या पांडेला डेट करत होता पण आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे.

सिद्धांतने तसे तर सारखे सारखे हेच सांगितले कि तो सिंगल आहे आणि सध्या फक्त तो आपल्या कामाला डेट करत आहे. पण त्याचा मित्र ईशानने आपल्या परीने कन्फर्म केले कि तो अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाला डेट करत आहे.

आता तुम्ही विचार करत असाल कि ईशानने या रिलेशनशिपला कसे कन्फर्म केले. जेव्हा करणने सिद्धांतला विचारले कि तू कोणाला डेट करत आहेस आणि त्याची रोमँटिक रिलेशनशिप कोणासोबत आहे. तेव्हा सिद्धांतने लगेच सांगितले कि तो सिंगल आहे आणि फक्त आपल्या कामालाच डेट करत आहे.

करण जेव्हा सारखे सारखे सिद्धांतला तोच प्रश्न विचारू लागला तेव्हा पाठीमागून ईशानने म्हंटले कि मेबी यू शुड आस्क हिम अनंदा क्वेश्चन. इथे ईशानने अनदर शब्दाला आनंदाने रिप्लेस केले जी एक मोठी हिंट आहे.