ख्रिश्चन वेडिंगनंतर हार्दिक पांड्या आणि नताशाने केले हिंदू रितीरिवाजाने लग्न, लग्नाचा फोटो आले समोर…

By Viraltm Team

Published on:

भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराउंडर हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशासोबत पुन्हा लग्न केले आहे. दोघांसाठी व्हॅलेंटाइन डे खूपच खास होता. यादिवशी दोघांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. दोघांनीही उदयपूरमध्ये कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले. ख्रिश्चन वेडिंगनंतर आता दोघांनी हिंदू रितीरिवाजा नुसार लग्न केले आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशाचे ख्रिश्चन वेडिंग जितके रोमँटिक होते तितकेच हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न खूपच फन. हार्दिक नताशा खूपच मस्ती करताना दिसले. दोघांचे फोटो सोशल मिडियावर खूपच पसंद केले जात आहेत. जिथे दोघे एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन गुलाबाच्या वर्षावात उभे दिसत आहेत. हार्दिक दुसऱ्या फोटोमध्ये नताशाचे नाचत स्वागत करत आहे.

नताशाने एका फोटोमध्ये घुंगटने आपला चेहरा लपवला आहे आणि तरीही कॅमेऱ्या मध्ये तिची स्माईल कैद होत आहे. नताशा जसे स्टेजवर पोहोचते आणि घुंगट काढते. हार्दिक पांड्या तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करतो जे खूपच क्युट वाटते.

वरमाळ घातलेले नताशा आणि हार्दिक पांड्यामधील हलकी फुलकी झलक पाहून तुम्ही देखील आनंदाने भारावून जाल. वरमाळ घालून नताशाची किलर पोज एकाद्या दिवापेक्षा कमी नाही. या कपलचे क्रिकेट आणि बॉलीवूड जगतामध्ये अनेक चाहते आहेत. ते म्हणतात न कि लग्नाचे बंधन सात जन्माचे असते. सात जन्माच्या या बंधनाला मजबुतीने बांधून हार्दिक पांड्या आणि नताशाने अग्नीला सात फेरे घेतले. एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन दोघे खूप सुंदर दिसत होते.

भांगेमध्ये सिंदूर भरणे आणि मंगलसूत्र घालणे हिंदू लग्नामधील एक महत्वाची विधी आहे. हार्दिकचे क्यूट एक्सप्रेशन आणि नताशाचे लाजणे खूपच क्युट दिसते. शेवटी दोघांनी आपल्या लाग्नामधील सर्वात अल्टीमेट पोज दिली आहे ज्यामध्ये दोघे रॉयल किंग आणि क्वीन प्रमाणे दिसत आहेत.

Leave a Comment