अभिनेत्री नर्गिस फाखरीने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. २०११ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्रीसोबत रणबीर कपूरदेखील मुख्य भूमिकेमध्ये होता. नर्गिसचे सुरुवातीचे करियर खूपच चांगले राहिले. तिला पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेयर अवॉर्डमध्ये बेस्ट फीमेल अॅक्ट्रेस डेब्यूसाठी पुरस्कार मिळाला होता.
दुसरीकडे अभिनेत्रीच्या अभिनयाला नापसंत केले जाऊ लागले. दर्शकांनी अभिनेत्रीच्या अभिनयावर कमेंट केलीच त्याचबरोबर तिच्या ओठांवर देखील घाणेरड्या कमेंट्स केल्या. यामुळे नर्गिस खूपच दुखी झाली, पण नंतर तिने ट्रोलर्सला असे उत्तर दिले होते ज्यामुळे सर्वांची बोलतीच बंद झाली होती.
२०२१ मध्ये नर्गिस फाखरीने एक मुलाखत दिली होती. मुलाखतीमध्ये नर्गिसने रॉकस्टारनंतर तिच्यावर झालेल्या टीकेबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. अभिनेत्री म्हणाली होती कि त्यांना हे माहित नाही कि त्यांना याबद्दल काय म्हणायचे आहे. पण जर माझे ब्रेस्ट मोठे असते तर त्यावर देखील त्यांनी कमेंट केल्या असत्या.
अभिनेत्रीने ट्रोलर्सला उत्तर देताना हे देखील म्हंटले होते कि कदाचित लोकांनी तिच्या बटवर लक्ष दिले नाही. ज्याची साईज खूप मोठी आहे. कदाचित रॉकस्टारमध्ये घातलेल्या पाटियाला सूट्समध्ये ते लपले होते. नर्गिस हे देखील म्हणाली कि तिचे बट तिच्या ओठांपेक्षा देखील मोठे आहेत. जर लोकांचे लक्ष त्याच्यावर गेले असते तर लोक फक्त त्याबद्दलच बोलले असते. अभिनेत्रीने शेवटी म्हंटले कि तिला याबद्दल काहीच फरक पडत नाही.
View this post on Instagram
नर्गिस फाखरी म्हणाली होती कि तिला तिच्या नाकाबद्दल देखील नेहमी चिंता असते. लोकांच्या कमेंट बघून तिला हायसे वाटले होते कि तिच्या नाकाबद्दल कोण बोलले नाही. रॉकस्टारच्या यशानंतर नर्गिसने मैं तेरा हीरो, मद्रास कॅफे आणि हाऊसफुल ३ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. नर्गिस अभिनेता संजय दत्तच्या तोरबाज या चित्रपटामध्ये अखेरची दिसली होती. नर्गिसने तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.