बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील नाना पाटेकर एक असे नाव आहे ज्यांनी आपल्या उत्कृष अभिनयाच्या बळावर लोकांच्या मनामध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. १ जानेवारी १९५१ रोजी जन्मेलेल्या विश्वनाथ पाटेकर यांना नाना पाटेकर म्हणून ओळखले जाते.
नाना पाटेकर यांचे डायलॉग आणि भूमिका लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. नाना चार दशकापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत आणि त्यांनी आपला उत्कृष्ट अभिनय लोकांसमोर पेश केला आहे. मग ती गंभीर भूमिका असो किंवा कॉमिक, रोमँटिक असो की नकारात्मक, प्रत्येक भूमिकेत त्यांना पसंद केले गेले.
१९७८ मध्ये आलेल्या गमन चित्रपटामधून आपल्या फिल्म करियरची सुरुवात करणारे नाना पाटेकर यांना खरी ओळख परिंदा चित्रपटामधून मिळाली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
नाना पाटेकर एक असे अभिनेता आहेत ज्यांनी ज्या चित्रपटामध्ये काम केले त्या चित्रपटामध्ये आपली एक वेगळी मोहोर उमटवली. त्यांचा बोलण्याचा अंदाज दर्शकांना खूपच पसंद येतो. चित्रपटामध्ये त्यांचे मोनोलॉग देखील खूप पसंद केले गेले.
नानाने आपल्या अभिनयाच्या बळावर चार फिल्मफेयर आणि तीन राष्ट्रीय फिल्म अवार्ड जिंकले आहेत. त्यांनी गिद्द, अंकुश, प्रहार, प्रतिघात सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. नाना पाटेकर यांनी थिएटर आर्टिस्ट नीलू उर्फ नीलकांति सोबत लग्न केले होते. दोघांचा घटस्फोट झालेला नाही पण दोघे एकत्र राहत नाहीत.
नाना पातेकेर्र यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे ते संजय दत्त सोबत कधी काम करत नाहीत. यामागे एक मोठे कारण आहे. वास्तविक १२ १९९३ रोजी मुंबईमध्ये ब्लास्ट झाला होता. या सिरियल्स ब्लास्टमध्ये संजय दत्त दोषी अढळला होता. याचा ब्लास्टमध्ये नाना पाटेकरने आपल्या भावाला गमवले होते.
अशामध्ये एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकरने म्हंटले होते कि संजय दत्तला मी कधीच माफ करणार नाही. त्यांनी म्हंटले होते कि संजय दत्तने भलेही सजा भोगली आहे पण त्याच्यासोबत मी कधीच काम करणार नाही.