समांथाच्या नात्यावर नागा चैतन्यने केला मोठा खुलासा, म्हणाला; मला जर ती भेटली तर तिला मिठी मारून दोन…

By Viraltm Team

Published on:

कॉफी विथ करण शो नेहमीच चर्चेमध्ये असतो. या शोचा ७ वा सीजन सोशल मिडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. इंटरनेटवर सध्या या शोची जबरदस्त चर्चा होत आहे. आता काही दिवसांपूर्वी याच नवीन एपिसोड नागा चैतन्यच्या पर्सनल आयुष्यामधील एक गुपित उघड झाले होते.

कॉफी विथ करणच्या लेटेस्ट सीजनमध्ये आपली दमदार उपस्थिती लावत समांथा रुथ प्रभूने हैराण करणारा खुलासा केला कि, तिचा माजी पती नागा चैतन्य आणि तिच्यादरम्यान खूपच मतभेद निर्माण झाले होते. तिने म्हंटले कि हे निश्चित आहे कि जर आम्हाला एका खोलीमध्ये ठेऊन जर आमच्यावर नजर ठेवली तर काही गोष्टी आम्हाला देखील जगापासून लपवाव्या लागतील.

एका नवीन मुलाखतीमध्ये नागा चैतन्यने सांगितले कि तो जर आता समांथाला भेटला तर त्याची प्रतिक्रिया काय असेल. यावर नागा चैतन्य म्हणाला कि मी तिला नमस्ते म्हणेन आणि तिला मिठी मारेन. नागा चैतन्य आणि समांथा रूथ प्रभुने ऑक्टोबर २०२१ मध्ये घटस्फोट घेऊन वेगवेगळा मार्ग निवडला होता. वेगळे होण्याची घोषणा करून दोघांनीहि चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.

मुलाखती दरम्यान बातचीत करताना लाल सिंह चड्ढाच्या अभिनेत्याने सांगितले कि आम्हाला दोघांना जे काही सांगायचे होते आम्ही त्याबद्दल अधिकृत विधान केले आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णय मग तो चांगला असो किंवा वाईट मिडियाला जरूर सांगतो आणि जर गोष्ट आमच्या नात्याबद्दल असेल तर समांथा आता खूपच पुढे निघून गेली आहे.

मी देखील खूप पुढे आलो आहे आणि मला याबद्दल जगाला काहीच सांगण्याची गरज नाही. आमच्या नात्याबद्दल सर्व अनुमान आणि अंदाज तात्पुरते आहेत. मी यावर जितकी अधिक प्रतिक्रिया देईन तितक्या जास्त बातम्या बनतील, म्हणून मी यावर शांत राहणेच पसंद करतो.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment